रेल्वेची कंजूशी एक्सप्रेस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेची कंजूशी एक्सप्रेस
रेल्वेची कंजूशी एक्सप्रेस

रेल्वेची कंजूशी एक्सप्रेस

sakal_logo
By

मालिका लीड
कोल्हापूर ते दिल्लीसह आठ राज्यांचा प्रवास घडवणारी रेल्वे सेवा रेल्वे प्रशासनाच्या गोंधळाच्या कारभाराची प्रतीक बनली आहे. कोट्यवधीचा महसूल कोल्हापुरातून मिळण्याची संधी असतानाही सेवा त्या पद्धतीने दिली जात नाही. वर्षानुवर्षाच्या गैरसोयी, रेंगाळेलेले प्रकल्प, कागदोपत्री घोळात अडकलेला कोकण रेल्वेला जोडण्याचा प्रस्ताव या बाबी खासदारांचा पाठपुरावा कमी पडत असल्याचे दिसत आहे. त्याचा वेध घेणारी मालिका आजपासून....
-----
मालिका लोगो ( रेल्वेचे चित्र वापरणे)
रेल्वे सेवेची ‘कंजुशी’ एक्‍स्‍प्रेस ः भाग १
-----
फोटो-86485
86719 पॅन्ट्रीकार सुविधेचे संग्रहित छायाचित्र
......
खानपान सुविधेची प्रतीक्षाच
पॅन्ट्रीकारचा अभाव ः प्लॅटफार्म चार आणि पाण्याची टाकी एक

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ३ : कोल्हापुरातून रेल्वेत बसून दिल्लीला जायचे किंवा अहमदाबादला जायचे तर जेवण-चहा नाष्‍ट्यांची सोय तुमची तुम्हीच करावी. उन्हाच्या झळा वाढत असताना चारपैकी तीन प्लॅटफॉर्मवर पिण्याचे थंड पाणी तुम्ही विकत घ्यायचे, गाडीच्या प्रतीक्षेत बसण्यासाठी बाकडीच नसल्याने तासभर उभ राहायचे या अशा अनेक शिक्षा रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना सक्तीने दिल्या जात आहेत. कोट्यवधींच्या निधीतून सुविधा देण्याच्या गप्पा मारणारे रेल्वे प्रशासन पिण्यासाठी पाणी देण्यात कंजुशी करत असल्याचे चित्र आहे. खासदारांनी एकदा हे अचानकपणे अनुभवण्याची गरज आहे.
येथील शाहू महाराज रेल्वे स्थानकावरून दिल्ली व अहमदाबादसाठी रेल्वे गाड्या सुटतात. जवळपास २४ ते ३० तासांचा प्रवास करावा लागतो. त्यात कोल्हापूरचे, परराज्यातील, परजिल्ह्यातील रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने या दोन्ही गाड्यातून प्रवास करतात. यातही कौटुंबीक प्रवाशांची चांगलीच गर्दी असते. एकादा प्रवास सुरू झाला की पुण्यापर्यंत जाण्यासाठी सात तास लागतात. तिथून पुढे सात तासाच्या तीन ते चार टप्प्यात प्रवास करावा लागतो. या काळात भूक लागते, जेवण किंवा नाष्ट्यांची गरज असते. मात्र, दिल्ली किंवा अहमदाबाद या दोन्ही गाड्यांना पॅन्ट्रीकार सुविधा नाही. त्यामुळे रेल्वेची खानपान सुविधा मिळत नाही.
प्रवास करताना अनेकजन आनलाईन बुकिंग करून जेवण मागवतात. ते पुढच्या संभाव्य स्थानकात वेळेत जेवण घेतले, पैसे दिले की पार्सलवाला निघून जातो. रेल्वेच्‍या प्रवासात निकृष्‍ट दर्जाच्या जेवणाने पोट बिघडून घेण्याची वेळ येते. यात पैसे देऊन मनस्ताप व पोट दुखीचा अनुभव घ्यावा लागतो. कोल्हापूर म्हणून बड्या प्रवाशांतून महसूल गोळा करायचा आणि सुविधा देण्यात कंजुशी करायची ही रेल्वे प्रशासनाची खोड आजवर कोणी मोडू शकलेले नाही.

चौकट
तहानलेल्या प्रवाशांची तळमळ
उन्हाळा सुरू झाला आहे. बाहेरून गाड्या येतात-जातात तेव्हा प्रवासी तहानलेले असतात. प्लॅटफॉर्म जवळ पिण्याचे पाणी असावे. तशी सोय दोन प्लॅट फार्मवर मिळून एकच आहे. मात्र, प्रत्यक्ष एकाच टाकीत पाणी असते. उर्वरित तीन प्लॅटफार्मवर पाणी असतेच असे नाही. असले तरी थंड नाही, पिण्याचे पाणी स्वच्छ दिसेल पण निर्जंतुकीकरण केलेले असेलच याची खात्री नाही. या सुविधांसाठी मोजका निधी लागतो. मात्र तोही खर्च करण्याची दानत रेल्वे प्रशासनाने दाखवलेली नाही.