
रोजगार मेळावा
86460
युवकांच्या हाताला काम मिळेल ः ॲड. राठोड
कोल्हापूर ः ‘मिशन २०२५ मेरे देश की धरती’ अंतर्गत शेकडो युवकांच्या हाताला काम मिळेल, अशी माहिती संयोजक ॲड. पंडित राठोड यांनी कोल्हापुरात आयोजित रोजगार मेळाव्यात दिली. राज्यातल्या तरुणांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने सुरू असलेला अनेक जिल्ह्यांतील रोजगार मेळावा कोल्हापूर येथेही झाला. कोल्हापूरसह आजपासच्या जिल्ह्यातील अनेक युवकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला. महालँड ग्रुप आयोजित बीपीएफटी कार्पोरेशनच्या माध्यमातून झालेल्या या मेळाव्यास अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी मार्गदर्शन केले. मेळाव्यास कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि तळ कोकणातून अनेक गरजू युवा उद्योजक, शासकीय-निमशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, स्व व्यावसायिक, नोकरदार, गृहिणी, बचतगट, सामाजिक संस्था व सार्वजनिक मंडळ हे यामध्ये सहभागी झाले होते.