गडहिंग्लज आगार प्रमुखपदी रणे

गडहिंग्लज आगार प्रमुखपदी रणे

03310
मिलींद कोले, सुभाष केटकाळे
------
शांतिनाथ पतसंस्था
अध्यक्षपदी कोले
कबनूर ः येथील श्री शांतिनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी मिलिंद जयकुमार कोले, उपाध्यक्षपदी सुभाष पारिसा केटकाळे यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या सभेत ही निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी एम. जी. शिंदी होते. सभेस संस्थेचे संस्थापक सुधाकरराव मणेरे, संचालक रमेश केटकाळे, बाळासाहेब केटकाळे, ज्ञानदेव बडवे, किरण कांबळे, नजरुद्दीन मुजावर, आनंदा कदम, सुरेखा केटकाळे, सीमा लिगाडे उपस्थित होते. निवडीनंतर अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळाचा सत्कार निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदी यांच्याहस्ते केला. निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिंदी यांचा तसेच इंदिरा कॉलनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश केटकाळे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थापक सुधाकरराव मणेरे व मिलींद कोले यांच्याहस्ते केला.
-------------
गडहिंग्लज आगार
प्रमुखपदी रणे
गडहिंग्लज : राज्य परिवहन महामंडळाच्या येथील आगार प्रमुख संजय चव्हाण यांच्या बदलीनंतर रिक्त जागेवर गुरुनाथ रणे यांची नियुक्ती झाली. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार केला. श्री. रणे हे मंगळवेढा आगारप्रमुखपदी कार्यरत होते. गडहिंग्लजचे आगारप्रमुख चव्हाण यांची बदली सांगली विभागाच्या विटा आगारप्रमुखपदी झाली आहे. आजच श्री. रणे यांनी पदाची सूत्रे घेतली. यावेळी संघटनेचे आगार अध्यक्ष इरफान तहसिलदार, सचिव अरविंद पाटील, नितीन कांबळे व संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com