डेक्कन महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डेक्कन महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
डेक्कन महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

डेक्कन महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन

sakal_logo
By

86468
कोल्हापूर : डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरिअर डिझाईन महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात बोलताना उद्योजक चंद्रशेखर डोली.

डेक्कन महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
कोल्हापूर : डेक्कन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संचालित डेक्कन कॉलेज ऑफ इंटिरिअर डिझाईनचे वार्षिक स्नेहसंमेलन शाहू स्मारक भवनमध्ये झाले. उद्योजक चंद्रशेखर डोली यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्नेहसंमेलनाची मृगजळ ही संकल्पना होती. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हा कार्यक्रम उत्तमरित्या सादर केला. अनिता ढवळे, रोहित पोतनीस यांनी परीक्षण केले. या वेळी संस्थापक अध्यक्ष आर्किटेक्ट प्रमोद बेरी, सुभाष कुलकर्णी, गजानन देऊसकर, विश्‍वस्त आर. आर. दोशी उपस्थित होते.
-------
ओरिएंटल स्कूलमध्ये पारितोषिक वितरण
कोल्हापूर : राजारामपुरी येथील ओरिएंटल इंग्लिश ॲकॅडमीच्या प्री. प्रायमरी, प्रायमरी, हायस्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा झाला. शरद आजगेकर, पी. एम. पाटील, डॉ. सतीश पत्की यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. संस्थेच्या सचिव प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका दीपा बावळे यांनी स्वागत केले. रविकिरण मोहिते यांनी आभार मानले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण उपस्थित होते.