सामानगडावर आग

सामानगडावर आग

gad212.jpg 86494
किल्ले सामानगड : पठारावर दहा एकरांवरील क्षेत्राला गुरुवारी लागलेल्या आगीत शेकडो झाडे होरपळली.

सामानगडावरील शेकडो झाडे खाक
दहा एकरातील पठारावर भडकला वणवा : सायंकाळी आग आली अटोक्यात

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : किल्ले सामानगडच्या पठारावर दहा एकरांहून अधिक क्षेत्रात आज वणवा भडकला. पठारावरील गवतामुळे आगीने रौद्र रुपधारण केल्याने शेकडो झाडेही त्यात होरपळून गेली. दिवसभर केलेल्या अखंड प्रयत्नानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास आग अटोक्यात आली. या घटनेबद्दल निसर्गप्रेमीतून खंत व्यक्त होत आहे.
सामानगडावरील श्री हनुमान मंदिराच्या दक्षिण बाजूला मोठे डोंगर क्षेत्र आहे. हा भाग वन विकास महामंडळाकडे येतो. या क्षेत्रात नव्याने वृक्ष लागवड केली आहे. दरम्यान, डोंगराच्या पायथ्याशी शेतकऱ्याने शेतातील तणाचे उच्चाटन करण्यासाठी शेतवडीत आग लावली होती. त्यातच या शेताजवळच्याच खासगी जमीनीतील गवताने पेट घेतला. त्यानंतर ही आग नियंत्रणात आलीच नाही. परिणामी, जोराच्या वाऱ्यामुळे वन विभागाच्या जंगल परिसरात ही आग पोहोचली.
डोंगर भागातही गवत असल्याने या आगीने क्षणातच रौद्ररुप धारण केले. आगीचे लोळ व धुराचे लोट पाहून वन मजुरांनी अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. वनपाल रमेश कोळेकर यांनी गडहिंग्लज नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. दिवसभर केलेल्या प्रयत्नानंतर सायंकाळी ही आग अटोक्यात आली. आग अटोक्यात आणण्यासाठी वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची धडपड सुरू होती. या आगीत गवत भस्मसात झाले असून, मोठे नुकसान झाले. शेकडो झाडेही होरपळली आहेत. नवीन लागवड केलेली झाडेही भक्ष्यस्थानी पडल्याने वनविभागाला पुन्हा लागवड करावी लागणार आहे. काही झाडांची पानगळ झाली आहे. दरम्यान, उन्हाळ्यात वणव्याच्या घटना घडू नयेत म्हणून जाळपट्टे काढून डोंगराच्या पायथ्याशी आग न लावण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. फारच गरज असेल तर वनविभागाला संपर्क करण्यास सांगून तसे ग्रामपंचायतीला पत्र दिल्याचेही कोळेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com