लाईनमन दिवस

लाईनमन दिवस

86519

महावितरण साजरा करणार
उद्या ‘लाईनमन दिवस’
महिला, पुरुष लाईनमनचा होणार गौरव
सकाळ वृत्तसेवा  
कोल्हापूर ता. २ :  ४ मार्च हा दिवस  ‘लाईनमन दिवस’ म्हणून  साजरा करण्याचे महावितरणच्या निर्देश मानव संसाधन विभागाने दिले आहेत. या दिवशी महावितरणच्या सर्व परिमंडल कार्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महावितरण आणि वीज कंपनीअंतर्गत लाईनमन दिवस साजरा करण्यात येणार आहे.
देशभरात डॉक्टर डे, इंजिनिअर्स डे,  असे दिवस साजरे होत असतात.  तशाच प्रकारे आता लाईनमन दिवस साजरा केला जाणार आहे.  जनमित्र म्हणजेच ‘लाईनमन’ हा महावितरणच्या व्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस, तसेच इतर खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी चोवीस तास सेवा देत असतात. या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर ४ मार्च हा ‘लाईनमन दिवस’ साजरा करण्यात येणार आहे. 
प्रादेशिक व परिमंडल स्तरावर नियमित कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत महिला व पुरुष लाईनमनचा मुख्य अभियंताच्या हस्ते गौरव करावा. या वेळी लाईनमन, अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे. ग्रामीण व दुर्गम अतिदुर्गम शाखा कार्यालयांमध्ये स्वतंत्रपणे लाईनमन दिवसाचे आयोजन करावे. आयोजित कार्यक्रमांमध्ये वीजसुरक्षेची शपथ घेण्यात यावी. वीजसुरक्षेबाबत प्रबोधन करणे अशाप्रकारे कार्यक्रम आयोजन करावेत, अशा सूचना सर्व विभागीय कार्यालयांना केल्या आहेत.
-----------------------
कोट
लाईनमन म्हणजे वीज कंपनीचा आत्मा असतो. ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्कात असलेला घटक आहे. ऊन पावसाची तमा न बाळगता पूर परिस्थितीतही लोकांना सेवा देत असतात. त्यांचा सन्मान होणे गौरवास्पद आहे.
- संदीप शिंदे, प्रधान तंत्रज्ञ, महावितरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com