टॅब ट्रिटमेंट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टॅब ट्रिटमेंट
टॅब ट्रिटमेंट

टॅब ट्रिटमेंट

sakal_logo
By

सकाळ रिडर्स इनो... चा घेणे........
-------------------
-----------------------

‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’चे सांधेदुखीसाठी आयुर्वेदिक उपचार
सांधेदुखीनं शरीरातच नाही तर कुटुंबातही अनुत्साह पसरतो. ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’चे शुद्ध आयुर्वेदिक उपचार घेऊन सांधेदुखीशी संबंधित आजारांवर पूर्णपणे मात करा आणि आयुष्यातला उत्साह पुन्हा मिळवा. ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, असं म्हणतात. त्याचप्रमाणे सांधेदुखीच्या वेदनांचा अनुभव घेतल्याशिवाय या दुखण्यानं होणाऱ्या त्रासाची तीव्रता लक्षात येत नाही. खरंच आहे हे, त्यामुळंच सांधेदुखीचा आजार सुरू झाल्यानंतर या त्रासातून कायमची आणि लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी धडपड केली जाते. या धडपडीतूनच विविध ठिकाणी उपचार केले जातात. बऱ्याचवेळा असं लक्षात येतं, की हे उपचार केवळ वरवरची मलमपट्टी करतात. त्यामुळंच तात्पुरता आराम मिळतो आणि औषध घेणं थांबवलं की पुन्हा त्रासाची सुरुवात होते. सांधेदुखीच्या बहुतेक रुग्णांची हीच तक्रार असते. ‘उपचार थांबवले की आजार पुन्हा सुरू होतो. आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी काही उपाय आहे का?’ हाच प्रश्न सांधेदुखी, कंबरदुखी आणि तत्सम आजार असलेले रुग्ण विचारत असतात. याच प्रश्नाचे कायमचे उत्तर देण्याच्या प्रयत्नातून ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’ची सुरुवात झाली. डॉ. टेब आणि डॉ. रुस्तम बी. जिनवाला यांनी जवळजवळ आठ वर्षांच्या संशोधन केले. त्यांना नेहमी पेनकिलर, स्टिरॉइड खाऊन, मालिश करून जगणाऱ्या रुग्णांचीच दृश्य दिसली. त्यामुळे त्यांनी इतक्या वर्षाच्या संशोधनानंतर १९९१ साली पुणे येथे ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ ची स्थापना केली. डॉ. जिनवाला हे आयुर्वेदिक डॉक्टर पारशी समाजातील होते. पारशी समाजातील अनेकांना संधीवाताचा त्रास होत असे आणि पेनकिलर्सचा त्यांना अधिकच त्रास होत असे. तर आपल्या समाजबांधवांचे आणि इतरांचे या त्रासदायक दुखण्यावर उपाय शोधला पाहिजे या ध्येयाने आणि हेतूने डॉ. जिनवाला यांनी ही उपचारपद्धती शोधली. त्यांनी १९८७ मध्ये एफडीएकडून परवाना मिळवला त्यानंतर या उपचाराच्या मानवी चाचण्या पार पडल्या. आयुर्वेदाचं महत्त्व अलीकडच्या काळात जगानं ओळखलं आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनीही आयुर्वेदाचं महत्त्व सातत्यानं अधोरेखित केलं आहे. आयुर्वेदात सर्वच आजारांवर उपचार आहेत, अशी भूमिका ते जगभरात मांडत आहेत. डॉ. जिनवाला यांचीही हीच भूमिका होती. सांधेदुखीवरही आयुर्वेदाच्या माध्यमातून कायमचे उपचार करता येतील, हाच विश्वास त्यांना होता. ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’च्या माध्यमातून हाच विश्वास त्यांनी जनमानसात रुजवला आहे. गेल्या जवळपास ३७ वर्षांपासून पुण्यातील ढोले पाटील रोडला ‘टेब ट्रीटमेंट क्लिनिक’ची प्रशस्त शाखा आहे. सांधेदुखीमुक्त आयुष्य रुग्णांना जगता यावे ही ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स’ची परंपरा पुण्यातील शाखा दिमाखात पुढं नेत आहे. डॉ. मंजूषा अवस्थी यांच्या नेतृत्वाखाली ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स, पुणे’ शाखा कार्यरत आहे.
- ‘टेब ट्रिटमेंट क्लिनिक्स