इंग्लंडच्या कंपनीतील अधिकाऱ्यांकडून विद्यापीठातील संशोधनाची दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्लंडच्या कंपनीतील अधिकाऱ्यांकडून विद्यापीठातील संशोधनाची दखल
इंग्लंडच्या कंपनीतील अधिकाऱ्यांकडून विद्यापीठातील संशोधनाची दखल

इंग्लंडच्या कंपनीतील अधिकाऱ्यांकडून विद्यापीठातील संशोधनाची दखल

sakal_logo
By

86532

इंग्लंडच्या कंपनीने घेतली
विद्यापीठातील संशोधनाची दखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ः इंग्लंडमधील ईस्पी लिमिटेडने शिवाजी विद्यापीठातील संशोधनाची दखल घेतली. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्कूल ऑफ नॅनो सायन्स, डीएसटी-सैफ सेंटरला भेट देवून तेथील संशोधन, उपकरणांची माहिती जाणून घेतली.
विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे औद्योगिक भागीदार सेराफ्लक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे. या कंपनीच्या महत्त्वाच्या औद्योगिक समस्येच्या निरसनासाठी डॉ. किरणकुमार शर्मा यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमचे संशोधन सुरू आहे. त्यातूनच एका विशिष्ट अशा महत्त्वपूर्ण उत्पादनाचे संशोधन आणि निर्मिती होत आहे. त्या उत्पादनाच्या मूलघटकांची गुणधर्मतपासणी सैफ सेंटर आणि पदार्थविज्ञान अधिविभाग यांच्या साहाय्याने होत आहे. त्याअनुषंगाने ईस्पी लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डेव्हिड कॅरिंग्टन, ‘सेराफ्लक्स’चे चेअरमन संजीव तुंगतकर, आदींनी विद्यापीठाला भेट दिली. त्यांनी प्रयोगशाळांना भेट दिली. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्याशी संवाद साधला. नॅनोसायन्स अधिविभागातील शास्त्रीय उपकरणे आणि संशोधन प्रक्रियेची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली. विद्यापीठातील संशोधन, उपकरणांबाबत कॅरिंग्टन यांनी समाधान व्यक्त केले. इंग्लंडमधील अधिकाऱ्यांची भेट शिवाजी विद्यापीठ आणि नॅनोटेक्नॉलॉजी आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित लोकल ते ग्लोबल कंपन्यांसाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला. डॉ. आर. जी. सोनकवडे, के. वाय. राजापुरे, डॉ. ठकार, डॉ. सपली, पी. डी. राऊत, एस. बी. सादळे, एस. डी. डेळेकर उपस्थित होते.