मुश्रीफ बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुश्रीफ बातमी
मुश्रीफ बातमी

मुश्रीफ बातमी

sakal_logo
By

मोफत धान्य वाटपाची
योजना सुरू ठेवा ःहसन मुश्रीफ

कोल्हापूर, ता. ५ ः प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात गोरगरिबांना मिळणारे मोफत धान्य ३१ डिसेंबर २०२२ पासून बंद झाले आहे. ही योजना निरंतर सुरू ठेवा, अशी मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. सरकार ही योजना बंद करणार असेल तर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत महिन्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदूळ मोफत देणार आहात का, असेही श्री. मुश्रीफ यांनी विचारले. या प्रश्नामध्ये आमदार श्री. मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेअंतर्गत मोफत धान्याचे वाटप, धान्य दुकानदारांचे कमिशन याबाबतही विचारणा केली आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटावयाचे धान्य एक जानेवारी २०२३ पासून केंद्राकडून आलेले नाही. ही योजना केंद्र शासन स्तरावरील बाब आहे. दरम्यान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना एक जानेवारी २०२३ ते ३१डिसेंबर २०२३ या कालावधीत मोफत धान्य वितरित केले जाणार आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
हायब्रीड ॲन्युटी मॉडेलचे रस्ते दहा -दहा वर्षे सुरू आहेत, त्यामुळे नागरिकांची हेळसांड होत आहे. केवळ बैठक घेऊन हा प्रश्न संपणार नाही, त्यासाठी ठोस उपाययोजन करावी अशी मागणी श्री. मुश्रीफ यांनी केली.
या प्रश्‍नाला उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले,‘या प्रश्नासंदर्भात सविस्तर माहिती घेऊन अधिकची माहिती मिळाल्यानंतर सविस्तर उत्तर देऊ. परंतु; हायब्रीड ॲन्युटी मॉडेल अंतर्गत केलेल्या सगळ्याच रस्त्याबाबत अशी परिस्थिती नाही.’