टुडे संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे संक्षिप्त
टुडे संक्षिप्त

टुडे संक्षिप्त

sakal_logo
By

गडकोट सांगाती
प्रदर्शन रविवारपर्यंत
कोल्हापूर : प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांच्या संग्रहात गेल्या ४० वर्षांच्या किल्ले भटकंतीत १३ हजारांहून अधिक छायाचित्रांचा समावेश आहे. त्यातील काही निवडक छायाचित्रांचे ‘गडकोट माझे सांगाती’ या प्रदर्शनाला राजारामपुरी सहाव्या गल्लीतील हिरेमठ हाईटस्‌‍मध्ये प्रारंभ झाला असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले असेल. प्रदर्शनाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन हे प्रदर्शन रविवार (ता. ५) पर्यंत सुरू राहणार असल्याचे प्रदर्शनाचे मुख्य संयोजक सुचित हिरेमठ यांनी सांगितले.
------------
जुनी पेन्शन मोर्चाचे आवाहन
कोल्हापूर : जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी शनिवारी (ता. ४) निघणाऱ्या मोर्चासाठी व चौदा मार्चपासून होणाऱ्या बेमुदत संपात कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अनिल लवेकर यांनी केले. ताराबाई पार्कातील सार्वजनिक बांधकाम विभागात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. गांधी मैदान येथून मोर्चाला सुरुवात होणार असून, हा मोर्चा गांधी मैदान, खरी कॉर्नर, पापाची तिकटी, दसरा चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोचणार आहे. सर्वांनी सकाळी दहा वाजता गांधी मैदान येथे जमावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी पूनम पाटील, वसंतराव डावरे, राजेंद्र वारके, बाबासाहेब शिंदे, सुभाष धबाले, सागर माने, शिवाजी निकम आदी उपस्थित होते.