फोटो स्टोरी दशावतार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो स्टोरी दशावतार
फोटो स्टोरी दशावतार

फोटो स्टोरी दशावतार

sakal_logo
By

फोटो स्टोरी
बी. डी. चेचर

दशावतार साकारताना...
८६४०७, ८६४०६, ८६४०८, ८६४०९, ८६४१०, ८६४०५, ८६४०४, ८६४०३, ८६४०२
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील मोलाचा ठेवा म्हणजे कोकणातील दशावतार. पूर्वी चार बत्यांच्या प्रकाशामध्ये रंगमंचावर रंग भरणारा हा राजा आज विजेच्या झगमगाटात आपली कला तेवढ्याच तडफेने परंपरा जपत सादर करतो. रसिकांना नाटकात गुंतवून ठेवणे व त्यांना आनंद देण्याचे काम दशावतारी कलाकार करतात. कोकणातील ही आगळी वेगळी कला साता समुद्रापार पोहोचली आहे. नाट्य, नृत्य, अभिनय, कथा, भावना, प्रेम, युद्ध अशा विविध छटांचा रंगमंचीय आविष्कार एकाचवेळी साधण्याचे कसब हे कलाकार पेलतात. कोकणाने पिढ्यान् पिढ्या जपलेला दशावतार महाराष्ट्रातील प्रत्येकाला भुरळ घालतो. तेच कलाकार पडद्यामागे बारकाईने तयारी करत असतात, विविधरंगी मुखवटे धारण करत असतात...त्यांच्या भूमिकेसाठीच्या तयारीचा टिपलेला हा अनोखा प्रवास.