फराळे सरपंच अपात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फराळे सरपंच अपात्र
फराळे सरपंच अपात्र

फराळे सरपंच अपात्र

sakal_logo
By

फराळेचे सरपंच डवर यांना पदावरून काढून टाकले
विभागीय आयुक्तांचे आदेश; प्रांताधिकाऱ्यांसाठी लाच घेताना होता सहभाग


कोल्हापूर, ता. २ ः राधागनगरी तालुक्यातील फराळे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप जयवंत डवर यांना पदावरून आणि सदस्य म्हणूनही काढून टाकण्यात आले. याबाबतचे आदेश आज पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
तत्कालीन राधानगरी प्रांताधिकाऱ्यांसाठी लाच घेताना सरपंच डवर यांनी स्वतःसाठी ७५ हजार आणि प्रांताधिकाऱ्यांसाठी पाच लाख रुपयांची लाच घेतली. यावेळी त्यांना लाचलुचपत विभागाने पकडले होते. त्यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर त्यांना या पदावर राहता येणार नसल्याबाबत तक्रार झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता. त्यामध्ये त्यांनी सरपंच डवर यांना पदावर राहण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. तो अहवाल ग्राह्य धरण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, सध्या विभागीय आयुक्तांकडे याबाबत सुनावणी सुरू होती. यावेळी त्रयस्थ पक्ष म्हणून सुरेश धोंडिराम सुतार यांच्यावतीने ॲड. विजय महाजन सहभागी झाले. त्यांनी केलेल्या युक्तिवादात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१) नुसार विभागीय आयुक्तांना सरपंच किंवा उपसरपंच यांनी गैरवर्तन केले, कर्तव्याबाबत दुर्लक्ष केले, तसेच कोणतेही लांच्छनास्पद वर्तणुकीबद्दल पंचायतीतून काढून टाकता येईल, असे स्पष्ट केले आहे. तशी तरतूद कायद्यामध्ये आहे, अशी बाजू मांडली.
चौकशीअखेर आज राव यांनी सरपंच डवर यांना सरपंच व सदस्य पदावरून काढून टाकण्यात येत असल्याचे आदेश दिले.