शिवसेनेतर्फे खा.राऊत यांचा निषेध

शिवसेनेतर्फे खा.राऊत यांचा निषेध

86506

खासगार राऊत यांचा निषेध
कोल्हापूर, ता. २ ः शिवसेना काँग्रेस - राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून संपविण्याचा एकप्रकारे विडा उचललेल्या खासदार संजय राऊत हे पूर्णत: खचून गेले आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांची व्यक्तव्ये पाहता उरला सुरला गटही संपण्याच्या मार्गावर आहे. राज्याचे विधिमंडळ हे लोकशाहीचे मंदिर असून, त्याला चोर संबोधणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीचा अवमान केला. त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा नैतिक अधिकार नाही. जर ते निवडून आलेल्या ४० आमदारांना टेस्ट ट्यूब बेबी संबोधणार असतील, तर त्याच आमदारांच्या जीवावर निवडून खासदार झाले आहेत. राऊत यांना सरोगेट बेबी म्हणायचे काय? अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. आज शिवसैनिकांनी खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला काळे फासून निषेध व्यक्त केला. छत्रपती शिवाजी चौकात त्यांनी हे आंदोलन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, नंदकुमार मोरे, शहरप्रमुख रणजित जाधव, दक्षिण शहरप्रमुख महेंद्र घाटगे, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, तुकाराम साळोखे, प्रा. शिवाजी पाटील, किशोर घाटगे, तालुकाप्रमुख बिंदू मोरे, समन्वयक सुनील जाधव, महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, समन्वयक पूजा भोर, रिक्षा सेना जिल्हाप्रमुख रमेश मोरे, जिल्हा समन्वयक विक्रम पोवार, रिक्षा सेना दक्षिण शहरप्रमुख राजू पवार, फेरीवाले सेना शहरप्रमुख अर्जुन आंबी, युवासेना शहरप्रमुख पियूष चव्हाण आदी उपस्थित होते.

हातकणंगलेत पोलिसांकडून कार्यकर्ते ताब्यात
हातकणंगले, ता. २ ः खासदार संजय राऊत यांनी जिल्हा दौऱ्याच्या वेळी विधिमंडळाला चोरमंडळ संबोधल्याने शिवसैनिकांत संताप निर्माण झाला होता. आज खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांच्या वक्तव्याचा निषेध करून त्यांना काळे झेंडे दाखवण्यासाठी जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक इचलकरंजी फाट्यावरील अतिग्रे येथील हॉटेल एक्सेलसमोर थांबले होते. पण, खासदार राऊत यांच्या गाडीचा ताफा येण्यापूर्वीच अर्धा तास अगोदर हातकणंगले पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. उशिरा त्यांची सुटका केली.
भाऊसाहेब आवळे, सतीश मलमे, अविनाश बनगे, झाकीर भालदार, रुकडी सरपंच राजश्री रूकडीकर, मालती इंगळे, सुजाता कांबळे, शोभा कोळी, अश्विनी सत्यजित इंगळे, निशिकांत पाटील, मोहन माने, अनिल बागडी पाटील, बबलू मकानदार, दिलीप इंगळे, शमुवेल लोखंडे, शीतल खोत, रमेश कांबळे, राकेश खोंद्रे, संतोष रुकडीकर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com