
''शिवराज''तर्फे रोहित आरबोळेंचा सत्कार
gad31.jpg
86553
गडहिंग्लज : शिवराज महाविद्यालयातर्फे रोहित आरबोळे यांचा सत्कार करताना प्रा. किसनराव कुराडे. शेजारी डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस. एम. कदम आदी.
-----------------------------
‘शिवराज’तर्फे रोहित आरबोळेंचा सत्कार
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयातर्फे माजी विद्यार्थी रोहित आरबोळे यांचा सत्कार केला. श्री. आरबोळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतलेल्या राज्यसेवा परीक्षेत ७१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते सत्कार केला. श्री. आरबोळे, संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांची भाषणे झाली. एम. के. चितारी, फार्मसीचे प्राचार्य राहुल जाधव, प्रा. के. एस. देसाई, प्रा. रवी खोत, प्रा. विक्रम शिंदे आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रमुख प्रा. एन. बी. ईकिले यांनी आभार मानले.