Mon, March 27, 2023

‘आर. आर.’ उद्या प्रवेश परीक्षा
‘आर. आर.’ उद्या प्रवेश परीक्षा
Published on : 3 March 2023, 12:18 pm
‘आर. आर.’ची उद्या प्रवेश परीक्षा
गडहिंग्लज : येथील आर. आर. ॲकॅडमीच्यावतीने सातवी व आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आठवी ते बारावी व नववी ते बारावी फाउंडेशन कोर्ससाठी प्रवेश परीक्षा होणार आहे. रविवारी (ता. ५) चर्च रोडवरील देशपांडे बिल्डिंगमध्ये ॲकॅडमीच्या हॉलमध्ये या परीक्षा होणार आहेत. सकाळी ११ ते १२.१५ या वेळेत परीक्षा होणार असून परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना ॲकॅडमीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव होणार आहे. परिसरातील व इतर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी प्रवेश परीक्षेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.