तृणधान्य प्रसारासाठी गडहिंग्लजला ‘मिलेट’ रॅली

तृणधान्य प्रसारासाठी गडहिंग्लजला ‘मिलेट’ रॅली

GAD34.JPG
86557
गडहिंग्लज : रोजच्या आहारातील तृणधान्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने शहरातून मोटारसायकल सहभागाने मिलेट रॅली काढली.
----------------------------------------------------------------------
तृणधान्य प्रसारासाठी
गडहिंग्लजला ‘मिलेट’ रॅली
गडहिंग्लज, ता. ३ : आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष अभियान जनजागृतीसाठी येथील शासनाच्या कृषी विभागातर्फे शहरातून मिलेट रॅली काढली. यामध्ये कर्मचारी व शेतकरी मोटारसायकलसह सहभागी झाले होते.
वडरगे रोडवरील कृषी कार्यालयातून रॅलीला प्रारंभ झाला. उघड्या जीपला ज्वारीची धाटे लावली होती. ज्वारीच्या कणसाची माळ व ज्वारीची पाने लावून एका कृषी सहायकाला ‘मिलेट बाबा’च्या रूपात जीपमध्ये उभे केले होते. हा उपक्रम नागरिकांच्या आकर्षणाचा ठरला. ही रॅली कृषी कार्यालयापासून बीएसएनएल ऑफिस, वीरशैव बँक, रिलायन्स पेट्रोल पंप, महालक्ष्मी मंदिर, बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, हॉटेल सूर्या, चर्च रोड, एम. आर. हायस्कूलपासून ही रॅली तालुका कृषी कार्यालय आवारात पोहोचली. तेथे रॅलीची सांगता झाली. या रॅलीद्वारे तृणधान्याचा वापर आहारात किती महत्त्वाची भूमिका बजावतात, याची जनजागृती केली. विविध घोषवाक्यांचे फलक लावले होते.
उपविभागीय कृषी अधिकारी सतीश रोकडे, तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे यांच्या मार्गदर्शनाने मंडळ कृषी अधिकारी हरिदास बोंगे, रंजना देशमुख, पर्यवेक्षक अरुण खोत, हरिश्‍चंद्र सिताप, कृषी सहायक अनिल कांबळे, सचिन नाईक, नंदकुमार दनगहू, अमित शिंदे, अविनाश यादव, सुरेखा शिंदे, विद्या मांगले, दीपाली कुंभार, आनंदा पाथरवट, विजय खोराटे, किरण मोर्ती आदींनी या रॅलीचे नियोजन केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com