सफाई कामगार निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगार निवेदन
सफाई कामगार निवेदन

सफाई कामगार निवेदन

sakal_logo
By

‘त्या’ सफाई कामगारांना
कामावर घेण्याचे आश्वासन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : ‘सीपीआर’मधील ‘त्या’ १६ सफाई कामगारांना पुन्हा कामावर घेण्याबाबत दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन सीपीआर प्रशासनाने आज दिले. येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयात सर्वपक्षीय समितीने दिलेल्या निवेदनावर चर्चा करण्यात आली. या वेळी हे आश्वासन दिले.
सीपीआर रुग्णालयात स्वच्छतेचा ठेका एका कंपनीला दिला आहे. ‘त्या’ कंपनीनेकडे २०० वर सफाई कामगार काम करतात. त्यांना किमान वेतन दिले जात नाही. भविष्य निर्वाह निधीची रक्कमही भरलेली नाही. त्यामुळे सफाई कामगारांनी एकत्र येत संघटनात्माक पातळीवर दाद मागितली. तेव्हा १६ कर्मचाऱ्यांना कंपनीने कामावरून काढले. त्यानंतर या कामगारांना कामावर घ्यावे, किमान वेतन द्यावे या मागण्यांसाठी कामगारांनी धरणे आंदोलन सुरू केले. सर्वपक्षीय संघटनेने गुरुवारी सहायक कामगार आयुक्तांना याबाबतही निवेदन दिले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी ‘सीपीआर’चे प्रशासन अधिकाऱ्यांना कामगार आयुक्त कार्यालयात बोलावून घेतले होते. या वेळी झालेल्या चर्चेत ‘सीपीआर’मध्ये सफाई कामाचा ठेका दिला त्याची करार प्रत सादर केली. ही प्रत नोटरी असल्याचे निदर्शनास आले. दोन दिवसात संबंधित सफाई कामगारांना कामावर घेण्याबाबत निर्णय घेतला जाईल. किमान वेतन भविष्य निर्वाह निधी भरणे याबाबतचे निर्णय घेऊ असे ‘सीपीआर’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या वेळी झालेल्या चर्चेत सर्वपक्षीय संघटनेतर्फे ॲड. बाबा इंदुलकर, माजी महापौर आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक भंडारे, चंद्रकांत पाटील, रेखा पाटील, सुनीता पाटील, संदीप देसाई आदी उपस्थित होते.