केएमटीने हटवले कर्मचारी

केएमटीने हटवले कर्मचारी

पार्किंगसाठी नेमले जाणारे
कर्मचारी केएमटीने केले कमी

कोल्हापूर, ता. ३ ः कर्मचाऱ्यांच्या नियोजनाबरोबरच बंद बस सुरू करण्यासाठी केएमटीने पाऊल उचलण्यास सुरूवात केली आहे. उत्पन्नापेक्षा पगारावर दुपटीने खर्च होत असलेल्या पार्किंगच्या ठिकाणावरील केएमटीचे दोन कर्मचारी प्रशासनाने काढले. तसेच बंद असलेल्या नऊ बसपैकी चार बस सुरू करण्यात येत आहेत.
केएमटीच्यावतीने शहरातील चार ठिकाणी पार्किंग चालवले जाते. तिथे कायम व रोजंदारीवरील कर्मचारी काम करत होते. त्यात चालक, वाहकांचा समावेश होता. एकीकडे बस चालक व वाहकांअभावी बंद असतात व दुसरीकडे चालक, वाहक पार्किंगच्या जागेवर काम करतात हा विरोधाभास होता. तसेच सीपीआर येथील पार्किंगच्या ठिकाणी तर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या निम्मेही उत्पन्न मिळत नव्हते. अशा ठिकाणी कर्मचारी का नेमले जातात, हा प्रश्‍न कॉमन मॅन संघटनेने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत उपस्थित केला होता. त्यानुसार अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक टीना गवळी यांनी सीपीआर येथील एक कर्मचारी कमी करून एका कर्मचाऱ्यावर काम चालवण्यास सांगितले आहे, तर बिंदू चौकात सहा कर्मचारी ठेवले आहेत. त्यातील काही कर्मचारी रंकाळा येथील पार्किंगच्या ठिकाणी जाऊन काम करतील, असे सांगितले आहे.
बंद असलेल्या नऊ बसपैकी चार बस सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठीचे स्पेअर पार्ट मागवले असून, चार बस रस्त्यावर आणल्या जाणार आहेत. त्यांचा विमाही भरला आहे. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसची संख्या वाढणार आहे. बसचे वेळापत्रकही तयार करण्यास सांगितले आहे. पुढील आठवड्यात महत्त्वाच्या दोन मार्गांवरील वेळ बदलण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचे नियोजन आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com