सांस्कृतिक कोल्हापूर

सांस्कृतिक कोल्हापूर

कलाकार ७, दिवस ७ अन् गाणी ७००

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः ‘ना नफ्यासाठी, ना स्वार्थासाठी, आमची कला गरजवंतांच्या आजारासाठी’ हे ब्रीद घेऊन नुकत्याच झालेल्या उपक्रमात सात कलाकारांनी सात दिवसांत सातशे गाणी सादर केली.
गीत गायनाचा छंद जोपासणाऱ्या काही कलावंत मंडळींना आपल्या कलेचा विनियोग गरजू व्यक्तींच्या आधारासाठी व्हावा या उद्देशाने रंगकर्मी प्रशांत जोशी यांनी एकत्र आणले. रोज एका कलाकाराने शंभर गाणी सादर केली. रमेश कांबळे, दिलीप माळी, चंद्रशेखर फडणीस, नरहर कुलकर्णी, अभिजित पाटील, गणेश जाधव यांनी पहिल्या सहा दिवशी, तर अखेरच्या दिवशी प्रशांत जोशी यांनी निवेदनासह शंभर गाणी सादर केली. विकास मोने, आरती मोने यांनी सलग सातही दिवस सर्व कलाकारांना प्रोत्साहन दिले. डॉ. मिलिंद गायकवाड यांनी वैद्यकीय सल्लागार म्हणून, तर रमेश सुतार यांनी ध्वनी यंत्रणेचे संयोजन केले. राजेंद्र चौगुले, निलांबरी जाधव, अमरसिंह रजपूत, मिलिंद नाईक, सुहास शेलार, मंजिरी लाटकर यांनी संयोजन केले.
................
86651
‘उच्छाद’सह उद्या दोन दीर्घांक
कोल्हापूर, ता. ३ ः येथील नाट्य वितरक आनंद कुलकर्णी यांच्या वतीने रविवारी (ता. ५) ‘उच्छाद’ आणि ‘व्हाया सावरगाव खुर्द’ हे दोन दीर्घांक रंगणार आहेत. दोन्ही प्रयोग एक तास वीस मिनिटांचे असून, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी चारला त्याचे सादरीकरण होईल. एका छोट्याशा गोष्टीसाठी भेटणारे लोक कुठल्या थरापर्यंत जाऊ शकतात, याचे एक सुंदर सादरीकरण ‘उच्छाद’मधून अनुभवायला मिळते. ‘व्हाया सावरगाव खुर्द’ हा दीर्घांकही साऱ्यांनाच अंतर्मुख करतो. दोन्ही धम्माल आविष्कार असून, देणगी प्रवेशिका नाट्यगृहावर उपलब्ध असल्याचे श्री. कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com