पत्रके आहेत पत्रके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रके आहेत पत्रके
पत्रके आहेत पत्रके

पत्रके आहेत पत्रके

sakal_logo
By

सारस्वत वधू-वर मेळावा सोमवारी
कोल्हापूर : सारस्वत विकास मंडळतर्फे फक्त सारस्वत वधू-वर पालक परिचय मेळावा सोमवारी (ता. ५) सारस्वत बोर्डिंग, सारस्वत भवन, दसरा चौक येथे दुपारी एक वाजता होईल. नावनोंदणी त्याच दिवशी सकाळी ११ पासून सुरु होईल. तरी सर्व सारस्वत वधू-वरांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पत्रकाद्वारे केले आहे.
...
गोखले महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन
कोल्हापूर : गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन झाला. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. स्मिता गिरी यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. गजानन राशीनकर, प्रा. डॉ. संतोष कांबळे यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून उद्‌घाटन झाले. प्रा. डॉ. राशीनकर यांनी संशोधनातून नवनिर्मिती करण्यासाठी नवतरुणांनी योगदान द्यावे असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. संतोष कांबळे यांनी संशोधनाची मुलभूत तयारी ही शिक्षणाचा पाया असून, प्रत्येक विद्यार्थ्याने संशोधन वृत्ती आत्मसात करावी, असे सांगितले. प्रा. जयकुमार देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेस प्रा. डॉ. राशिनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. वॉल पेपर प्रदर्शन झाले. प्रा. पी. बी. झावरे, प्रा. पी. पी. सुतार, प्रा. डॉ. डी. व्ही. आवळे, प्रा. डी. के. नरळे, प्रा. एस. ए. स्वामी, प्रा. आर. जी. तावरे, प्रा. पी. बी. बेरगळ, प्रा. पी. व्ही. पालकर उपस्थित होते. प्रा. झावरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. के. नरळे यांनी आभार मानले.
...
भविष्यकाळात मराठीतूनच अभियांत्रिकी अभ्यासक्रम’
कोल्हापूर : ‘‘भविष्यकाळात मराठीतूनच वैद्यकीय, अभियांत्रिकी अभ्यासक्रम होईल, असे प्रा. वसंत खोत यांनी सांगितले. गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन झाला. प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर अध्यक्षस्थानी होते. प्रा. खोत यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहाराने अभिवादन केले. प्रा. जयकुमार देसाई, प्रा. डॉ. मंजिरी मोरे, दौलत देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य एस. एच. पिसाळ, पर्यवेक्षक एस. एन. मोरे, प्रा. एम. एम. कांबळे, प्रा. एस. आर. गडदे, प्रा. एस. एस. गुरव, प्रा. टी. पी. चौगुले उपस्थित होते. प्रा. डॉ. आर. एच. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. एस. एस. गुरव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. आर. बी. पोवार यांनी आभार मानले.
...
‘ध्येय निश्चित केल्यानंतर यश हमखास मिळते’
कोल्हापूर : ‘ध्येय निश्चित केल्यानंतर यश हमखास मिळते. विद्यार्थ्यांनी जीवनात आत्मविश्वास, जिद्द आणि मेहनत ही यशाची त्रिसूत्री अवलंबिल्यास कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते,’ असे सांगली आकाशवाणी केंद्राचे प्रसारण अधिकारी डॉ. दीपक ठमके यांनी सांगितले. न्यू कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आणि मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्त व्याख्यान झाले. स्पर्धा परीक्षेतील मराठी भाषेचे महत्त्व, आकाशवाणीचे कार्य, रोडिओ जॉकी यावर डॉ. ठमके यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मनीषा नायकवडी यांनी मराठी भाषा गौरव गीत गायन केले. प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण झाले. प्रा. एस. एन. इनामदार उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. ए. एम. शेख यांनी स्वागत केले. प्रा. जे. बी. दिंडे यांनी परिचय करून दिला. समृद्धी पताडे हिने सूत्रसंचालन केले. प्रा. श्रीरंग तराळ यांनी आभार मानले.
...
‘महानगरपालिका आरोग्य’ची निवडणूक बिनविरोध
कोल्हापूर : महानगरपालिका आरोग्य विभाग सेवकांची सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. संस्थेचे अध्यक्ष दिनकर आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचालक निवडणूकीत श्री. आवळे, अशोक बुचडे, संदेश कांबळे, अविनाश आवळे, गणेश सकट, संजय शिर्के, सुजाता रुईकर, वनिता सुर्यवंशी, आनंदा लाखे, धीरज लोंडे यांची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकारानुसार ही बिनविरोध निवड झाली.
...
नृसिंहवाडीत आज कवी संमेलन
कोल्हापूर : भारतीय कोल्हापूर मंचतर्फे उद्या (ता. ४) श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सायंकाळी चार ते रात्री आठ वेळेत पाहिले राज्यस्तरीय कवी संमेलन आयोजित केल्याची माहिती आयोजक रोहिणी पराडकर यांनी पत्रकाद्वारे दिली. संमेलनास कोल्हापूर, लातूर, बंगळूर, पुणे, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, बुलढाणा, जळगाव, सातारा, बारामती, मिरज येथील नवोदित कवी आणि कवयित्री आपल्या कविता सादर करणार आहेत. याशिवाय काही कवी आणि कवयित्रींचा पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे. भारतीय कोल्हापूर मंच या व्हाटसअप ग्रुपचा हा पहिलाच अनोखा अभिनव उपक्रम असून, या काव्य संमेलनात नवोदित कवि, कवयित्रींनी भाग घ्यावा, असे आवाहन सौ. पराडकर यांनी केले आहे.
...
86707 संजीव परिख
86709 विजय कागले

संजीव परीख अध्यक्षपदी
कोल्हापूर : दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस् असोसिएशनच्या त्रैवार्षिक नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा सुरेश लिंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेमध्ये अध्यक्षपदी संजीव परीख तर उपाध्यक्षपदी विजय कागले यांची तसेच ऑनररी सचिवपदी धन्यकुमार चव्हाण, जॉईंट ऑनररी सचिवपदी किरण तपकीरे, ऑनररी खजानिसपदी श्रीनिवास मिठारी यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळात वैभव सावर्डेकर, सुरेश लिंबेकर, विवेक शेटे, अभयकुमार अथणे, अमर क्षीरसागर, संतोष लाड यांचा समावेश आहे.
...