पाण्यासाठी महिलांचा मनपावर मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्यासाठी महिलांचा मनपावर मोर्चा
पाण्यासाठी महिलांचा मनपावर मोर्चा

पाण्यासाठी महिलांचा मनपावर मोर्चा

sakal_logo
By

86741
पाण्यासाठी महिलांचा मनपावर मोर्चा
इचलकरंजीत सहाय्यक उपायुक्तांशी चर्चा; तीव्र आंदोलनाचा इशारा
इचलकरंजी, ता. ३ ः येथील कुडचे मळा यासह विविध परिसरात मुबलक व नियमित पाणी पुरवठा करावा, या मागणीसाठी महिलांनी महापालिकेवर मोर्चा काढला. सहाय्यक उपायुक्त केतन गुजर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. पाणी टंचाईची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी दिला. पैलवान अमृत भोसले, माजी नगरसेवक मोहन कुंभार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
येथील कुडचे मळा, हेरलगे मळा, बाळनगर, तांबे माळ, गुरुकन्नन नगर, संत मळा, श्रीपाद नगर, आवाडे मळा, बरगे मळा या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नियमित पुरेसे पाणी मिळत नसल्याने तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परिसरातील बहुतांश सार्वजनिक कुपनलिका बंद आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी महापालिकेवर मोर्चा काढला. यामध्ये महिलांचा लक्षणीय समावेश होता. यावेळी पै. भोसले व कुंभार यांनी गुजर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या परिसरात कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना नियमित व मुबलक पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली. यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष देशपांडे, बाजीराव कांबळे यांच्याशी चर्चा केली. कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईची झळ बसत असल्याची तक्रार यावेळी मोर्चेधारकांनी केली. पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आले.