दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची सोमवारपासून तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची सोमवारपासून तपासणी
दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची सोमवारपासून तपासणी

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची सोमवारपासून तपासणी

sakal_logo
By

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची
सोमवारपासून तपासणी

कोल्हापूर, ता. ३ ः विविध प्रलंबित मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी सुरू केलेले उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आंदोलन काल, गुरुवारी मागे घेतले. त्यानंतर आज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागात मुख्य नियमकांची बैठक झाली. उद्या, नियमकांची बैठक होईल. त्यानंतर सोमवार (ता. ६) पासून दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणीची प्रक्रिया सुरू होईल.
या शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे कोल्हापूर विभागातील सुमारे ११ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी ठप्प झाली होती. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने शिक्षकांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयात आज इंग्रजी, गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांच्या मुख्य नियामकांची बैठक झाली. उद्या, सर्व विषयांच्या नियमकांची बैठक होईल. त्यानंतर सोमवारपासून उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनाची प्रक्रिया सुरू होईल, असे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव डी. एस. पोवार यांनी सांगितले.