दीक्षांत समारंभाबाबत नव्या राज्यपालांना विद्यापीठाचे पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दीक्षांत समारंभाबाबत नव्या राज्यपालांना विद्यापीठाचे पत्र
दीक्षांत समारंभाबाबत नव्या राज्यपालांना विद्यापीठाचे पत्र

दीक्षांत समारंभाबाबत नव्या राज्यपालांना विद्यापीठाचे पत्र

sakal_logo
By

दीक्षान्त समारंभाबाबत राज्यपालांना विद्यापीठाचे पत्र

कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाने ५९ व्या दीक्षान्त समारंभाबाबत राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठविले आहे. त्याद्वारे विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्याकडे या समारंभ आयोजनासाठी तारीख निश्‍चित करून देण्याची विनंती केली आहे. या पत्रात मार्च महिन्याचा दुसरा आणि तिसऱ्या आठवड्यातील तारीख निश्‍चितीबाबत सुचविले आहे. विद्यापीठाने १६ फेबुवारी रोजी दीक्षान्त समारंभ घेण्याचे निश्‍चित केले होते. त्याचे प्रमुख पाहुणे देखील ठरले. मात्र, तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. त्यासह विद्यापीठीय आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. या पार्श्‍वभूमीवर विद्यापीठ प्रशासनाने काही अपरिहार्य कारणास्तव दीक्षान्त समारंभ स्थगित करण्याचा निर्णय १३ फेब्रुवारी रोजी जाहीर केला. नवे राज्यपाल रमेश बैस यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे या समारंभाचे आयोजन आणि त्यांच्या उपस्थितीबाबत विद्यापीठ प्रशासनाने त्यांना पत्र पाठविले आहे. त्यांच्या उत्तराच्या प्रतीक्षेत विद्यापीठ प्रशासन आहे.