डॉमेंट्रीला नगन्य प्रतिसाद शौचालय कुलूप बंदच

डॉमेंट्रीला नगन्य प्रतिसाद शौचालय कुलूप बंदच

लोगो - रेल्वे सेवेची ‘कंजूशी’ एक्स्प्रेस - भाग २

डॉमेंट्री सेवेला नगण्य प्रतिसाद
माहिती देण्यात अपयश; स्वच्छतागृह कुलूप बंदच
शि‍वाजी यादव : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : प्रवाशांना रात्रीची विश्रांती घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने डॉमेंट्री सुविधा सुरू केली. मात्र, गाड्यांची संख्या मोजकीच असल्याने प्रवासी कमी आहेत. जे प्रवासी आहेत त्यांना डॉमेंट्री सुविधेची माहिती देण्यात कंजूशी केली आहे. त्यामुळे डॉमेंट्रीला नगण्य प्रतिसाद आहे. थोड्या-फार फरकाने अशीच अवस्था स्वच्छतागृहाची असल्याने ५० लाख खर्चाचे स्वच्छतागृह कुलूप बंद आहे.
कोरोनाकाळापूर्वी कोल्हापूर रेल्वेस्थानकावरून रोजच्या जवळपास १२ गाड्या येत-जात होत्या. जवळपास दीड ते दोन हजार प्रवासी होते. यात काही नवीन गाड्या सुरू होणार होत्या. त्यामुळे साहजिकच प्रवासी संख्या आणखी वाढणार होती. अशा प्रवाशांना रात्रीच्या वेळी रेल्वेस्थानकांवर विश्रांती घेता यावी यासाठी डॉमेंट्रीची सुविधा केली. त्याला चार वर्षे पूर्ण झाली. अवघ्या ९० रुपयांत बारा तासांसाठी येथे प्रवाशांना विश्रांती घेता येते. एका वेळी जवळपास ४८ प्रवाशांना विश्रांती घेता येईल, अशी सुविधा आहे. एखादे कुटुंब आले किंवा नोकरदार व्यवसायिक प्रवासी आले तरी त्यांना या सेवेचा लाभ घेता येणे शक्य आहे. मात्र, बारीक अक्षरातील एक फलक वगळता या सुविधेची फारशी माहिती कोणी देत नाही. त्यामुळे नव्याने कोल्हापुरात आलेल्या प्रवाशांना अनेकांना रात्रभर राहण्यासाठी अन्य पर्याय शोधावा लागतो.
रेल्वे प्रशासनने सुविधा केली की, आमचे काम संपले असा सरकारी छापाची काम येथे सुरू असल्याचे दिसते. डॉमेंट्री सुविधेसाठी रेल्वेस्थानकात अलिशान कक्ष आहे. रेल्वेस्थानक कर्मचारी असो की कोणी काही माहिती विचारली, तर एखाद्या वाक्यात उत्तर दिले जाते जणू प्रवाशांशी आपले काही घेणे देणेच नाही, अशा अविर्भावात त्रोटक माहिती मिळते.
-------------
चौकट
स्वच्छतागृह सुरू करण्यात अपयश
रेल्वेस्थानकावर आत बाहेर दोन स्वच्छतागृहे आहेत. आतील स्वच्छतागृहाजवळ प्लॅटफॉर्म तयार झाला. येथे वर्दळ वाढल्यास स्वच्छतगृह बंद करावे लागेल, अशी स्थिती आहे. बाहेरच्या बाजूला सुमारे ५० लाखांच्या खर्चातून नवीन स्वच्छतागृह बांधून दीड वर्ष झाले; उद्‍घाटन झोकात झाले; पण प्रत्यक्ष स्वच्छतागृह अद्याप सुरू नाही. दोन्ही स्वच्छतागृह चालवण्यासाठी पाच लाखांची अनामत भरण्याची अट घातल्याने त्याचा ठेका कोणी घेतलेला नाही. गेल्या दीड वर्षात किमान पाच वरिष्ठ अधिकारी येथे येऊन गेले. मात्र, स्वच्छतागृह सुरू करण्यात यश कोणालाही आलेले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com