
इचल : आवाडे सत्कार
ich41.jpg
86917
इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे यांच्या सत्कारप्रसंगी कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश दत्तवाडे व इतर.
(छायाचित्र : अनंतसिंग)
प्रलंबित कामे
लवकरच मार्गी
आमदार प्रकाश आवाडे; नागरी सत्कार सोहळा
इचलकरंजी, ता. ४ ः तळागाळातील प्रश्नांची जाण असल्यानेच राज्य सरकार गतीने प्रगती करीत आहे. त्यामुळे मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास आमदार प्रकाश आवाडे व्यक्त केला.
सफाई कर्मचार्यांचा प्रलंबित वारसा हक्क, पाणीटंचाई दूर करण्यासाठी आणि तारदाळला ब्रेक टेस्ट ट्रॅक सुरु करण्यास प्रशासकीय मंजुरी आणल्याबद्दल आमदार आवाडे यांचा नागरी सत्कार झाला. त्याप्रसंगी आमदार आवाडे बोलत होते. माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते सत्कार झाला.
तत्पूर्वी, इचलकरंजीत आगमन होताच राजर्षी शाहू पुतळा येथे क्रेनच्या सहाय्याने २१ फुटांचा पुष्पहार घालून आमदार आवाडे यांचे स्वागत झाले. प्रमुख मार्गावरुन धनगरी ढोल, झांजपथक, हलगी आदी वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यांनतर श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सत्कार झाला.
आमदार आवाडे म्हणाले, ‘मविआ सरकारमधील पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील नेत्यांनी विकासकामांसाठी निधी अडविला. इंडस्ट्रियल झोन होऊ दिला नाही. पण आम्ही थांबलो नाही तर चौपट प्रगती साधली.’
पालिकेची महापालिका करण्याचा निर्णय घाईगडबडीने झाला. महापालिका झाल्यामुळे सहाय्यक अनुदान बंद होईल म्हणून वस्तू व सेवा कराच्या माध्यमातून वार्षिक 350 कोटी अनुदानाची मागणी केली आहे. तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनी मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याचे भूमिपूजन करू, अशी घोषणा त्यांनी केली. प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत, प्रास्ताविक अहमद मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन अरुण निंबाळकर व रमेश पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.