विशेष मुलांच्या पालकांची परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष मुलांच्या पालकांची परिषद
विशेष मुलांच्या पालकांची परिषद

विशेष मुलांच्या पालकांची परिषद

sakal_logo
By

86929
कोल्हापूर : चेतना अपंगमती विकास संस्था आयोजित पंधराव्या राज्यस्तरीय विशेष मुलांच्या परिषदेचे उद्‍घाटन करताना शाळेतील विद्यार्थी संदीप पाटील. यावेळी शेजारी रविकांत आडसूळ, उत्कर्षा पाटील, नरेश बगरे, दिलीप बापट आदी.

विशेष मुलांसाठीच्या योजनांचा लाभ घ्या
रविकांत आडसूळ; पंधराव्या राज्यस्तरीय परिषदेला प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : विशेष मुलांचे पालकत्व हा एक आव्हानात्मक आणि संवेदनशील विषय असून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे सहआयुक्त रविकांत आडसूळ यांनी केले. येथील पंधराव्या विशेष मुलांच्या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे होते.
आडसूळ म्हणाले, ‘‘विशेष मुलांच्या भविष्याची जबाबदारी पालकांबरोबरच शासनानेही उचलणे आवश्यक आहे. महापालिकेने आजवर चोवीसशे दिव्यांग लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून त्यांना निवृत्तीवेतन सुरू केले आहे.’’
सविता कबनूरकर यांच्या गीत गायनाने परिषदेला प्रारंभ झाला. यावेळी मार्व्हलस इंजिनिअरिंग ग्रुपच्या उत्कर्षा पाटील, उमेद परिवाराचे अध्यक्ष रमेश वांद्रे, परिवार सह्याद्रीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बुरडे, परिषदेचे निमंत्रक दिलीप बापट, मुख्याध्यापिका अजया पाटील, उद्योग केंद्राचे अधीक्षक कृष्णात चौगले आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्याध्यक्ष पवन खेबूडकर यांनी सूत्रसंचालन केले. नीलेश वालवालकर यांनी आभार मानले. दरम्यान, दोन दिवसांच्या या परिषदेत मतिमंद मुलांच्या विविध समस्या व पालकत्व या अनुषंगाने चर्चा होणार आहे.