केडीसी गौरव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केडीसी गौरव
केडीसी गौरव

केडीसी गौरव

sakal_logo
By

86948
...

‘अण्णासाहेब पाटील’कडून केडीसीसीचा गौरव

अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ; १,२७८ जणांना ११९ कोटींचा वित्तपुरवठा

कोल्हापूर, ता. ४ ः कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजाच्या हजारो तरुणांना रोजगार, उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्जपुरवठा केला. बँकेच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांच्या हस्ते बँकेला सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात कार्यक्रम झाला. व्यक्तिगत कर्ज विभागाचे व्यवस्थापक एस. के. बावधनकर व संचालक रघुनाथ जांभळे यांनी सन्मान स्वीकारला.
बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाच्या पाठबळाने बँक यशोशिखरावर पोहोचलेली आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षाअखेरपर्य॓त बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांतर्गत मराठा समाजातील १,२७८ जणांना ११९ कोटींचा वित्तपुरवठा केलेला आहे. जिल्ह्यातील इतर बँकांच्या तुलनेत जिल्हा बँक अग्रस्थानी आहे. बँकेला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, उमेद अशा विविध योजनांमध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार मिळालेले आहेत. बँकेने चालू पीक हंगामात फेब्रुवारीअखेरपर्यंत १,६०० कोटींचा कर्जपुरवठा केलेला आहे. त्यामध्ये खरीप हंगामासाठीचे उद्दिष्ट इष्टांकापेक्षा ११५ टक्के जास्त आहे.
शेतीसह ग्रामीण भागाशी निगडित सर्वच कर्जपुरवठ्यांमध्ये इष्टांकांची पूर्तता नेहमीच इतर बँकांपेक्षा जास्त करून बँकेने जिल्ह्याला सबंध राज्यात अग्रेसर ठेवले आहे. प्राप्तिकर खात्याकडून कोल्हापूर विभागातील नॉन कॉर्पोरेट विभागात बँकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांना बँकेमार्फत सेवा-सुविधा दिल्या जातात. सभासद संस्थांना दहा टक्के लाभांश दिला जातो.
..................
चौकट
टीकेनंतर सन्मान
कालच्या कार्यक्रमात महामंडळाचे अध्यक्ष पाटील यांनी जिल्हा बँकेची तुलना कागल तालुक्यातील अन्य बँकेशी करताना त्या बँकेने कमी शाखा असून जास्त कर्जपुरवठा केला तर जिल्हा बँकेने शाखा जास्त असून कमी पुरवठा केल्याची टीका केली. त्याच कार्यक्रमात जिल्हा बँकेचा सन्मान करण्याची वेळ श्री. पाटील यांच्यावर आली.