अंबाबाई मंदिरात हवे
प्राथमिक आरोग्य केंद्र

अंबाबाई मंदिरात हवे प्राथमिक आरोग्य केंद्र

अंबाबाई मंदिरात हवे
प्राथमिक आरोग्य केंद्र
भाविकांना तक्रारी उदभवल्यास होते धावपळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात प्राथमिक आरोग्य केंद्र हवे, अशी मागणी आता पुन्हा जोर धरू लागली आहे. गर्दीच्या वेळी भाविकांना चक्कर येणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. पूर्वी ज्या ठिकाणी आरोग्य केंद्र होते तेथे सध्या धर्मशास्त्र मार्गदर्शक कक्ष केला असून आरोग्य केंद्रापेक्षा हा कक्ष महत्वाचा आहे का, असा संतप्त सवालही उपस्थित होवू लागला आहे.
पाच वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने प्रायोगिक तत्वावर आरोग्य केंद्र सुरू केले आणि पुढे ते कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय झाला. सकाळी आठ ते दुपारी दोन आणि दुपारी दोन ते रात्री आठ अशा दोन शिफ्टमध्ये येथे वैद्यकीय सुविधा मिळत होती. परगावाहून येणाऱ्या भाविकांना आरोग्याची आकस्मिक एखादी तक्रार निर्माण झालीच तर कुठे जायचे हे माहिती नसते. त्यामुळे या आरोग्य केंद्राबाबत भाविकांतून चांगल्या प्रतिक्रिया होत्या. जनरल चेकअपसह रक्तदाब, शुगर तपासणी आणि आवश्यकतेनुसार कार्डिओग्रामची सोयही येथे होती. विशेष म्हणजे शहरातीलच डॉक्टर कोणत्याही मानधनाशिवाय येथे सेवाभावी वृत्तीने सेवा देत. एका डॉक्टरना दोन महिन्यातून किमान एकदा येथे सेवा करण्याची संधी मिळेल, अशी व्यवस्थाही होती आणि देवस्थान समितीबरोबरच केमिस्ट असोसिएशनकडून आवश्यक औषधेही पुरवली जात होती. रोज किमान चाळीस ते पन्नास भाविक या सेवेचा लाभ घेत आणि गर्दीच्या वेळी शंभराहून अधिक भाविकांना या सेवेचा लाभ व्हायचा. पण, हे केंद्रच पुढे देवस्थान समितीने बंद केले.
-----------
चौकट
कायमस्वरूपी व्यवस्था हवी...
नवरात्रोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात वैद्यकीय कक्ष उभारला जातो. पण, अलिकडच्या काळात भाविकांची गर्दी वाढतच असून कायमस्वरूपी मंदिराच्या आवारात प्राथमिक आरोग्य केंद्र असायला हवे, अशी भाविकांची मागणी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com