Mon, June 5, 2023

कोरगांवकर हायस्कूल मध्ये चोरी
कोरगांवकर हायस्कूल मध्ये चोरी
Published on : 4 March 2023, 3:47 am
कोरगांवकर हायस्कूलमध्ये
साडेबारा हजारांची चोरी
कोल्हापूर ः सदर बाजार येथील कोरगांवकर हायस्कूल आणि सावित्री श्रीधर विद्यालयात १२ हजार ४०० रुपयांच्या ॲल्युमिनियम फ्रेमची चोरी झाली आहे. याबाबत मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, की सदर बाजार येथे कोरगांवकर हायस्कूल आणि सावित्री श्रीधर विद्यालय आहे. त्याच्या खिडक्यांच्या काचा फोडून चोरट्याने ॲल्युमिनियम फ्रेम लंपास केल्या. साधारण २९ जानेवारी ते तीन मार्चच्या दरम्यान ही चोरी झाली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे