आजरा ः आवंडी धनगरवाडा आबिटकर यांची बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः आवंडी धनगरवाडा आबिटकर यांची बातमी
आजरा ः आवंडी धनगरवाडा आबिटकर यांची बातमी

आजरा ः आवंडी धनगरवाडा आबिटकर यांची बातमी

sakal_logo
By

86960

आजऱ्यात पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार
प्रकाश आबिटकर; आवंडी धनगरवाडा येथे विकासकामांचा प्रारंभ

आजरा, ता. ४ ः तालुक्यात पर्यटनवाढीला वाव आहे. पर्यावरणपूरक पर्यटनासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतून आवंडी धनगरवाड्यावर झालेल्या रस्त्यामुळे तालुक्याच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला.
आवंडी धनगरवाडा (ता. आजरा) विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री सडक योजना अडीच कोटींचा रस्ता, अंगणवाडी (धनगरवाडा क्र. १) यांचे लोकार्पण व सामाजिक सभागृह, अंगणवाडी भूमिपूजन, जलजीवन योजना भूमिपूजन (धनगरवाडा क्र. ३), गावठाण वीजपुरवठा या विकासकामांचा प्रारंभ आमदार आबिटकर यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्य़क्ष जयवंतराव शिंपी, तहसीलदार विकास अहिर, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे गटविकास अधिकारी दाजी दाईंगडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, अनिकेत चराटी, रणजित सरदेसाई प्रमुख उपस्थित होते.
आमदार आबिटकर म्हणाले, ‘धनगरवाड्यावर झालेल्या रस्त्याने चेहरामोहरा बदलला आहे. येथील महिला बचत गटांना बांबू, मध व्यवसायातून रोजगार मिळेल. अधिकाऱ्यांनी इन्कम जनरेशनचे प्रोग्रॅम घ्यावेत. महिला बचतगटांना सक्षम करावे.’ धनगरबांधवांनी व्यथा मांडल्या. वीज वितरणचे अधिकारी दयानंद कमतगी, सार्वजनिक बांधकामचे अधिकारी श्री. सावंत, वनपाल संजय नीळकंठ, माजी सरपंच बाबू येडगे, नाथ देसाई, जितेंद्र भोसलेंसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. जानबा कोकरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सरपंच बयाजी मिसाळ यांनी आभार मानले.
-----------
चौकट-
वनहक्क दाव्यांची प्रकरणे मार्गी लावा
वनहक्क दाव्यांमुळे धनगर समाजाला हक्क व अधिकार मिळाले आहेत. त्यांचे प्रलंबित दावे निकाली काढावेत. वनप्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची भरपाईही वेळेत द्यावी, अशीही सूचना आमदार आबिटकर यांनी केली.