इचल : सकाळ वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : सकाळ वर्धापन दिन
इचल : सकाळ वर्धापन दिन

इचल : सकाळ वर्धापन दिन

sakal_logo
By

86994

इचलकंरजी ः ‘सकाळ’ चे इचलकरंजी विभागीय कार्यालय वर्धापन दिनानिमित्त विद्युत रोषणाईने उजळले आहे.
...

‘सकाळ’च्या इचलकरंजी विभागीय
कार्यालयाचा आज वर्धापन दिन

सायंकाळी ५ ते ८ दरम्यान स्नेहमेळाव्याचे आयोजन

इचलकरंजी, ता.४ ः ‘सकाळ’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन उद्या, रविवारी (ता.५) साजरा होत आहे. या निमित्त वाचक, जाहिरातदार, विक्रेते, हितचिंतक यांच्यासाठी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ८ या वेळेत रोटरी क्लब (महेश सेवा समितीजवळ) येथे हा स्नेहमेळावा होणार आहे.
वस्त्रनगरीसह हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील वाचकांशी ‘सकाळ’चे गेली अनेक वर्षे अतूट नाते निर्माण झाले आहे. त्यामुळे नेहमीच विश्वासार्हता जपणाऱ्या ‘सकाळ’ने दोन्ही तालुक्यातील विविध प्रश्नांची सखोल मांडणी सातत्याने केली. यातून विविध क्षेत्रातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागले. पंचगंगा नदी प्रदुषणसारख्या गंभीर प्रश्नावर ‘सकाळ’ने घेतलेल्या सडेतोड भूमिकेचे वाचकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. दरवर्षी वर्धापन दिनाच्या निमित्ताने काढण्यात येणाऱ्या विविध विशेषांकातूनही नव्या - जुन्या घडामोडी, विकासात्मक बदलाचा मागोवा व भविष्याचा वेध घेण्यात आला. यंदाही वर्धापन दिनानिमित्त कृषीमंत्रा, व्हीजन वस्त्रोद्योग @ २५ अशा सकस पुरवण्या प्रसिध्द करण्यात येत आहेत. अत्यंत संग्राह्य व वाचनीय असे हे विशेषांक आहेत. त्यामध्ये विविध मान्यवरांचे लेख आहेत. तर दरवेळी वेगळी संकल्पना घेवून एक वेगळी पुरवणी देण्याची परंपरा यंदाही कायम राखली आहे. यंदा ‘ब्रॅंड आॅफ सिटी’ ही पुरवणी प्रकाशित करीत आहोत. यामध्ये अनेक व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
------


प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वितरण
रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह आणि श्री कॉम्पुटर एज्युकेशन यांच्यावतीने महिलांसाठी मोफत प्राथमिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. ‘सकाळ’ माध्यम समूह या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. या उपक्रमाला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्राचे वाटप स्नेहमेळाव्यात करण्यात येणार आहे.