
-
86997
संजय पाटील
86999
संदीप चोडणकर
संजय पाटील यांना वसुंधरा सन्मान पुरस्कार
अवनी संस्था, संदीप चोडणकर वसुंधरा मित्र; किर्लोस्कर चित्रपट महोत्सवात ९ पासून
कोल्हापूर, ता. ४ : पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती करणाऱ्या किर्लोस्कर उद्योग समूहचा ‘किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ ९ ते ११ मार्च या काळात आयोजित केला आहे. या वेळी यावर्षीचा वसुंधरा सन्मान पुरस्कार देशी वाणांच्या बियाणांचे संशोधन, संवर्धन आणि प्रसार करणारे, बायफ संस्था आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सल्लागार समितीचे सदस्य संजय पाटील यांना जाहीर झाला. वसुंधरा मित्र पुरस्कार अवनी आणि संदीप चोडणकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण ११ मार्चला किर्लोस्कर वसुंधराचे अध्यक्ष आर.आर. देशपांडे, सी. जी. रानडे व धीरज जाधव यांच्या हस्ते होणार आहे.
छत्रपती शाहू इस्टिटूट ऑफ बिझनेस एज्यकेशन अँड रिसर्च, स्वयंसिद्धा आणि डॉ. व्ही. टी. पाटील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत असून ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हा या महोत्सवाचा मुख्य विषय आहे. गुरूवार ९ मार्च सकाळी १० वाजता ‘सायबर’चे संचालक डॉ. एस. पी. रथ, ‘किर्लोस्कर’चे कागल प्लांट प्रमुख सी. जी. रानडे, धिरज जाधव, वसुंधरा फेस्टिवल प्रमुख वीरेंद्र चित्राव यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ‘सायबर’मध्ये ३० लघुपट दाखविण्यात येणार आहेत. या वेळी ‘इ वेस्ट’चे व्यवस्थापन आणि प्लास्टिकपासून इंधन निर्मिती या विषयावर स्वप्नील कुलकर्णी आणि सौरभ मराठे हे तरुण केसस्टडी मांडणार आहेत . तसेच पर्यावरण, निसर्ग आणि शाश्वत शेतीचे अभ्यासक नरेंद्र खोत हे ‘शाश्वत शेती’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षानिमित्त ९ आणि १० मार्च दरम्यान तृणधान्ये आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा इको बझार सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत स्वयंसिद्धा संस्थेच्या आवारात भरवण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये सीएसआर अधिकारी शरद आजगे, धीरज जाधव, राजेंद्र काकडे, सूर्यकांत दोडभिसे यांनी दिली.