
इमारतीसाठी सर्वतोपरी सहकार्य
gad53.jpg
87005
जरळी : ज्ञानदा मोफत वाचनालयात झालेल्या कार्यक्रमात संजय मंडलिक यांचा सत्कार दत्ता देशपांडे तर राजेश पाटील यांचा सत्कार टी. एम. दुंडगे यांनी केला. रामाप्पा करिगार, अमर चव्हाण, अभय देसाई, अनिकेत कोणकेरी आदी उपस्थित होते.
-------------------------
इमारतीसाठी सर्वतोपरी सहकार्य
खासदार संजय मंडलिक; जरळी वाचनालयाला दिली सदिच्छा भेट
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. ५ : वाचन चळवळीचा मी पुरस्कर्ता आहे. ही चळवळ वाढीस लागावी यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो. वाचनालयात वाचक वाढावेत यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्ञानदा वाचनालयाचे काम चांगले आहे. या वाचनालय इमारतीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन खासदार संजय मंडलिक यांनी दिले.
जरळी (ता. गडहिंग्लज) येथील ज्ञानदा मोफत वाचनालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी श्री. मंडलिक बोलत होते. आमदार राजेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. खासदार मंडलिक व आमदार पाटील यांनी वाचनालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. वाचक संख्या वाढण्यासाठी सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. नव्या इमारतीचा आराखडा तयार करा. निधी देण्याची नक्की व्यवस्था करू अशी ग्वाही श्री. मंडलिक यांनी दिली.
संस्थापक अध्यक्ष दत्ता देशपांडे यांनी प्रास्ताविकात वाचनालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नव्या इमारतीसाठी खासदार फंडातून सहकार्य करण्याची मागणी केली. पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामाप्पा करीगार, बाबासाहेब पाटील, वाचनालयाचे संचालक विठ्ठल चौगुले, अविनाश कुलकर्णी, आप्पासाहेब जाधव, अनिकेत कोणकेरी, अभय देसाई, टी. एम. दुंडगे आदी उपस्थित होते. सहाय्यक ग्रंथपाल अन्वेशा माद्याळे यांनी आभार मानले.