
बहुजन समाजातील तरुणांनी स्वावलंबी व्हावे
gad57.jpg
87013
अत्याळ : समरजित घाटगे यांच्याहस्ते बांधकाम कामगारांना सुरक्षा किटचे वाटप झाले. प्रकाश पाटील, बचाराम मोहिते, प्रताप मोहिते, अजित जामदार आदी उपस्थित होते.
-------------------------------------------------------
बहुजन समाजातील
तरुणांनी स्वावलंबी व्हावे
समरजित घाटगे : अत्याळला बांधकाम कामगारांना सुरक्षा किट
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थीपर्यंत पोहचवण्यासाठी गट तट न पाहता मी व कार्यकर्ते अविरत आपल्यासोबत आहे. बहुजन समाजातील तरुणांनी व्यवसायाद्वारे स्वत:च्या पायावर उभे रहावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.
अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे १०२ बांधकाम कामगारांना सुरक्षा किट वाटप, शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक व खेळाडूंच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. पंचायत समितीचे माजी सदस्य प्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. श्री. घाटगे म्हणाले, ‘एकाच रस्त्यावर नारळ वाढवत उद्घटनाचे कार्यक्रम घेवून लोकांच्या डोळ्यावर पट्टी न बांधता विकासाच्या राजकारणावरच मते मागण्यासाठी येणार आहे.’ बचाराम मोहिते म्हणाले, ‘अभ्यास, दुरदृष्टी, विकासाचा दृष्टीकोनातून सर्व योजना तळागाळात पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न समरजित घाटगे करीत आहेत.’
रामचंद्र शिंदे यांनी स्वागत केले. अजित जामदार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच संजीवनी माने, गोडसाखर संचालक कविता पाटील, उपसरपंच अनिता घोरपडे, प्रताप मोहिते, माधुरी मोहिते, अंजना पाटील, बबन पाटील, शामराव गाडीवडर, पांडूरंग गाडीवड्ड, संजय मळगेकर, वसंत कांबळे आदी उपस्थित होते. रामदास मोहिते यांनी आभार मानले.