महिला दिनानिमित्त रंगणार स्प्रिंग फेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनानिमित्त रंगणार स्प्रिंग फेस्ट
महिला दिनानिमित्त रंगणार स्प्रिंग फेस्ट

महिला दिनानिमित्त रंगणार स्प्रिंग फेस्ट

sakal_logo
By

गार्डन्स क्लबतर्फे
रंगणार वसंत उत्सव

कोल्हापूर, ता. ५ ः गार्डन्स क्लबतर्फे रुईकर कॉलनी मैदानावर बुधवारी (ता. ८) व गुरुवारी (ता. ९) स्प्रिंग फेस्टचे आयोजन केले आहे. दुपारी तीन ते रात्री नऊपर्यंत हा महोत्सव चालेल. बुधवारी उद्‌घाटनानंतर हेअर ॲक्सेसरीजवर फ्लोरल आर्टिस्ट संगीता सावर्डेकर यांची कार्यशाळा होईल. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पारंपरिक पोशाखांची शास्त्रोक्त माहिती व सादरीकरण अशी स्पर्धा रंगेल. यामध्ये फॅशन तज्ज्ञ प्रज्ञा कापडी परीक्षण करतील. यामध्ये सहभागी स्पर्धक व विजेत्यांनी भेटवस्तू दिली जाणार आहे. गुरूवारी (ता. ९) दुपारी तीन वाजता रंगपंचमीपासाठी रंग बनविण्याचे प्रात्यक्षिक होईल. ज्यामध्ये स्वयंपाक घरातील विविध पदार्थ व आपल्या आजूबाजूला असणारी बागेतील विविधरंगी फुले पाने या सर्वांपासून रंग बनवण्यास शिकवले जातील. हे हर्बल कलर प्रात्यक्षिक सर्वांसाठी मोफत आहे.
सायंकाळी क्लबच्या गार्डनिंगच्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ होईल. भारतीय वनसेवेतील उपवनसंरक्षक सांगलीच्या नीता कट्टे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. फेस्टमध्ये विविध प्रकारचे स्टॉल, खाद्यपदार्थांची रेलचेल असेल. या फेस्टला भेट देण्याचे आवाहन गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी केले.