
वडणगे
87119
वडणगे : येथे ग्राहक पंचायत करवीर तालुक्याच्या वतीने वडणगे येथे ‘लाईनमन डे’ निमित्त वायरमनांचा सत्कार करताना शिवाजी दिंडे. शेजारी हणमंत पाटील, के. डी. सावंत आदी.
ग्राहक पंचायत करवीरतर्फे
‘लाईनमन डे’ साजरा
वडणगे : अखिल भारतीय ग्राहक पंचायत करवीर तालुक्याच्या वतीने वडणगे येथे ‘लाईनमन डे’ झाला. ग्राहक पंचायतचे तालुका संघटक योगेश तिवले यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी महावितरणच्या सर्व वायरमनना नॅपकिन, पेन, टेस्टर, डायरी आदी वस्तू देऊन गौरविले. ग्राहक पंचायत परिवहन प्रमुख शिवाजी दिंडे, माजी सरपंच सचिन चौगले, बाजीराव पोवार, के. डी. सावंत, कोषाध्यक्ष एच. बी. पाटील, महावितरणचे कनिष्ठ अभियंता जेरॉम गेरॉल्ड, अरुण राऊळ, सादिक शेख, ऋतुराज नरके, शुभम कळके, गणेश पाटील, प्रदीप पाटील, सौरभ पाटील, अक्षय व्हरगे, सचिन तोडकर आदी उपस्थित होते.