‘भीमा तुला श्रध्दांजली’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भीमा तुला श्रध्दांजली’ पुस्तकाचे प्रकाशन
‘भीमा तुला श्रध्दांजली’ पुस्तकाचे प्रकाशन

‘भीमा तुला श्रध्दांजली’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

87140
कोल्हापूर : ‘भीमा तुला श्रद्धांजली’ पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ए. बी. राजपाल, डॉ. प्रशांत गायकवाड, प्राचार्य बापूसाहेब माने, डॉ. एस. एस. महाजन, प्राचार्य एस. बी. कांबळे, प्राचार्य मधुकर कांबळे.

‘भीमा तुला श्रद्धांजली’ पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर, ता. ५ : प्राचार्य एस. बी. कांबळे-दोनवडेकर यांनी संकलित आणि संपादित केलेल्या ‘भीमा तुला श्रद्धांजली’ पुस्तकाचे प्रकाशन वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. महाजन यांच्या हस्ते झाले. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड उपस्थित होते. मिरज येथील प्राचार्य बापूसाहेब माने अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य कांबळे यांनी पुस्तक निर्मितीची पार्श्‍वभूमी स्पष्ट केली. डॉ. महाजन म्हणाले, ‘भीमा तुला श्रद्धांजली’ ग्रंथात प्राचार्य कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या महापरिनिर्वाणप्रसंगी श्रद्धांजली वाहण्यासाठी दिलेली भाषणे, लिहिलेले लेख आणि कवितांचे व्यवस्थित संकलन- संपादन केले आहे. हे पुस्तक डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला आणि विचारांना समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे.’
कास्ट्राईबचे महासचिव नामदेवराव कांबळे, डॉ. राजन कांबळे, आनंद मांडुकलीकर, महेंद्र इनामदार, बाळासो खुपिरेकर, काशीनाथ चोकाककर, दीक्षा चोकाककर, अभिजित राजपाल, धम्म संघाचे कार्यकर्ते बी. एल. कांबळे, भोसले, वसंतराव कांबळे, विश्‍वास शिंदे, फुले शाहू आंबेडकर फोरमचे मोहिते उपस्थित होते. प्राचार्य मधुकर कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. ए. बी. राजपाल यांनी आभार मानले.