Thur, June 1, 2023

सरदेसाई हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
सरदेसाई हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
Published on : 5 March 2023, 2:05 am
सरदेसाई हायस्कूलमध्ये विज्ञान दिन
कोल्हापूर ः कोपार्डेकर शाळा समूहाच्या श्रीमती आनंदीबाई सरदेसाई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन झाला. यानिमित्त शाळेत विज्ञान प्रदर्शन भरवले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एस. अतिवाडकर यांनी केले. या विज्ञान प्रदर्शनात रेन वॉटर हार्वेस्टिंग, भूकंप दर्शक यंत्र, सिमेंट मिक्सर, घनतेचे प्रयोग, विद्युत चुंबक कुंतल, शेततळे, ग्लोबल वॉर्मिंग प्रोजेक्ट, पवनचक्की, ज्वालामुखीचा उद्रेक, सौर ऊर्जेचा वापर करून वापरण्यात येणारी यंत्रे, टूथपेस्ट वापर करून चालणारी होडी यासारखे विज्ञानावर आधारित उपकरणे विद्यार्थ्यांनी मांडली होती. सूत्रसंचालन बी. डी. भुसनर यांनी केले. आरती कोपार्डेकर यांनी आभार मानले. विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षण डी. आर. गुरव, व्ही. एस. पाटील, जे. एम. पोवार यांनी केले.