Sat, June 3, 2023

आजरा ः वणवा बातमी
आजरा ः वणवा बातमी
Published on : 5 March 2023, 2:10 am
सुलगाव, हाजगोळी परिसरात वणवा
आजरा ः सुलगाव व हाजगोळी परिसरात लागलेल्या वणव्यात सुमारे शंभर एकरचा जंगल परिसर जळाला. आजरा- गडहिंग्लज मार्गालगतच्या जंगल परिसरात वणवा लागला. सायंकाळनंतर हा वणवा आटोक्यात आला. दुपारनंतर या परिसरात वणवा लागला. जंगलात वाळलेला पालापाचोळा व गवत यामुळे वणवा पसरत गेला. या वणव्यात दुर्मिळ औषधी वनस्पती, विविध प्रकारची झाडे, वनस्पती जळून खाक झाल्या आहेत. वणव्याचे नेमके कारण समजले नाही. पण ही आग लावली गेली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तालुक्यात वणवे लागण्याचे प्रमाण या काही दिवसात वाढले आहे. यंदा वणव्यामुळे खासगी व वनजमीनीतील सुमारे पंधराशे हेक्टर क्षेत्र जळाले आहे. मोठ्या प्रमाणात काजू बागांना फटका बसला आहे. आज लागलेल्या वणव्यात हाजगोळी व सुलगाव परिसरातील काजू बागा जळाल्या आहेत.