
चेतना राज्यस्तरीय परिषद
87146
कोल्हापूर ः १५ व्या राज्यस्तरीय विशेष मुलांच्या ‘मंथन’ या पालक परिषदेचा समारोप खुल्या अधिवेशनाने झाला. या वेळी पुरुषोत्तम शर्मा, दिलीप बापट, डॉ. पी. एम. चौगुले, पुरूषोत्तम बुरडे, पवन खेबूडकर, चेतनाचे अध्यक्ष नरेश बगरे.
बौद्धिक अक्षम मुलांच्या लैंगिक
समस्या संवेदनशीलपणे हाताळा
बुरडे; राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः बौद्धिक अक्षम मुलांच्या लैंगिक समस्या संवेदनशीलपणे हाताळल्या पाहिजेत. विशेष मुलींच्या मासिक पाळी संदर्भात त्यांची सरसकट गर्भाशय निर्हरण शस्त्रक्रिया करणे हा त्यावरील उपाय नव्हे, मुलींच्या पालकांनी, समाजाने साधक बाधक विचार करून हा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत परिवार सह्याद्री संघटनेचे पुरुषोत्तम बुरडे यांनी व्यक्त केले. चेतना अपंगमती विकास संस्था, परिवार सह्याद्री महाराष्ट्र व उमेद परिवार आयोजित बौद्धिक अक्षम मुलांच्या पालकांच्या दोन दिवसांच्या १५ व्या राज्यस्तरीय मंथन या पालक परिषदेच्या खुल्या अधिवेशनाचा आज समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. पी. एम. चौगुले होते.
पालकांचे शंकानिरसन पुरुषोत्तम शर्मा, पवन खेबूडकर यांनी केले. दोन दिवसांच्या परिषदेत वेगवेगळ्या सत्रात तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. दिलीप बापट, चेतनाचे अध्यक्ष नरेश बगरे उपस्थित होते.