`आजरा`ची ३१ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

`आजरा`ची ३१ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा

`आजरा`ची ३१ जानेवारी अखेरची ऊस बिले जमा
आजरा, ता. ५ ः येथील आजरा शेतकरी साखर कारखान्याची १६ ते ३१ जानेवारीदरम्यान गाळप झालेल्या ४९ हजार ८१५ टन ऊसाची ३००० रुपयांप्रमाणे होणारी रक्कम १४. ७५ कोटींची ऊस बिले विनाकपात संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुनिल शिंत्रे यांनी दिली.
आजरा साखर कारखान्याने आजअखेर ११९ दिवसांत ३ लाख ३६ हजार टन ऊसाचे गाळप करून सरासरी १२.११ टक्के साखर उताऱ्याने ४,०६,९०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. व्यवस्थापनाने ४ लाख टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण अतिपावसामुळे ऊस उताऱ्यामध्ये १० टक्के घट झाली. तसेच तोडणी वाहतूक यंत्रणा काही अंशी कमी पडली. त्यामुळे ठरवलेले उद्दिष्ट साध्य करता आलेले नाही. ऊसाची बिले, तोडणी वाहतुक कंत्राटदार, मालपुरवठादार, कंत्राटदार यांची बिले तसेच कर्मचारी यांचा पगार वेळेत अदा करण्याचे नियोजन कोल्हापूर जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याने केलेले आहे. त्याचप्रमाणे चालू लागवड हंगामासाठी ऊसाच्या नोंदी घेण्याचे काम शेती गट कार्यालयात सुरू आहे. तसेच फेब्रुवारीमध्ये गळितास आलेल्या ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले लवकरच अदा करण्यात येणार आहे.
कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक विष्णूपंत केसरकर, वसंतराव धुरे, श्रीमती अंजना रेडेकर, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, मारूती घोरपडे, सुनिता रेडेकर, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, अनिल फडके आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com