सुरेश केसरकर यांचा नागरी सत्कार

सुरेश केसरकर यांचा नागरी सत्कार

87195
कोल्हापूर : राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष सुरेश केसरकर यांचा जाहीर नागरी सत्कार करताना आमदार सतेज पाटील.

राज्यघटना वाचवण्यासाठी
प्रयत्न हवेत ः सतेज पाटील
कोल्हापूर, ता. ४ : ‘आज भारतीय संविधान धोक्यात आले आहे की काय अशी परिस्थिती आहे. संवेदनशील आणि जागृत माणसांनी एकत्र येऊन भारतीय राज्यघटना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.
राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष सुरेश केसरकर यांचा जाहीर नागरी सत्कार झाला. शाहू स्मारक भवन येथे ‘क्रिएटिव्ह हँड ऑफ महाराष्ट्रा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने अजय दळवी, चंद्रकांत मोरे, सुधाकर सावंत, गौरी मुसळे, संजय सासणे, जॉर्ज क्रूझ, अशोक आलदर, शिवाजी चौगुले, छाया पाटील, नारायण धनगर, बाजीराव हेवाळे, रवींद्र श्रावस्ती, डॉ. उज्वल कोठारकर, प्रा. डॉ. हाशिम वलांडकर, शंकर अंदानी, मंगल श्रावस्ती, शंकर पुजारी, डॉ. सागर सानप, प्रा. माधव आग्री, चंद्रकांत सावंत, मोनिका तारमळे, डॉ. संदीप गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.
निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सचिव दिलीप जगताप, प्रा. डॉ. श्रीपाद देसाई, खासगी प्राथमिक शिक्षण सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे उपस्थित होते. सुरेश केसरकर नागरी सत्कार समिती, राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्र, नवश्रमिक सोशल फाउंडेशन, महाराष्ट्र आणि निर्मिती फिल्म क्लबने आयोजन केले होते. ॲड. करुणा विमल यांनी मानपत्राचे वाचन केले. स्वप्निल गोरंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील कांबळे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com