Sun, May 28, 2023

शेणीदान
शेणीदान
Published on : 5 March 2023, 4:04 am
87212
पंचगंगा स्मशानभूमीस ३० हजार शेणीदान
कोल्हापूर ः छत्रपती शिवाजी पेठेतील अचानक तरुण मंडळातर्फे होळी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा स्मशानभूमीस ३० हजार शेणीदान करण्यात आल्या. मंडळाकडून २१ वर्ष शेणीदान उपक्रम तसेच इतरांना आवाहनही केले जात आहे.
तालीम संस्था, तरूण मंडळे व उपनगरातून मंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत आहे. होळी पौर्णिमेपुरता हा प्रतिसाद न राहता ज्यावेळी स्मशानभूमीत जाऊ त्या वेळी दानपेटीत गुप्तदान करावे यासाठी मंडळाकडून गुप्तदानही करण्यात आले. शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजीत चव्हाण, राजेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक परिक्षीत पन्हाळकर सुहास देशपांडे, महेश धाडणकर,विलास कुलकर्णी, गिरीश बावडेकर, शैलेश मोरे, ओंकार वेढे, अभिजित जोशी, संदिप पोवार, महेश कापशीकर, गौरव धाडणकर, हर्षद बावडेकर,परेश वेढे आदी उपस्थित होते.