इचल : सकाळ वर्धापन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल : सकाळ वर्धापन दिन
इचल : सकाळ वर्धापन दिन

इचल : सकाळ वर्धापन दिन

sakal_logo
By

87217

इचलकरंजी ः ‘सकाळ’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहमेळावा पार पडला. या वेळी रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह व श्री कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेतर्फे व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने घेण्यात आलेल्या संगणक प्रशिक्षणार्थीं महिलांना प्रमाणपत्रांचे वितरण ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी लेखा व्यवस्थापक अरविंद वर्धमाने, जाहिरात उपसरव्यवस्थापक आनंद शेळके, मुख्य बातमीदार पंडित कोंडेकर, सहायक व्यवस्थापक दत्ता टोणपे उपस्थित होते.
...

‘सकाळ’च्या इचलकरंजी कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव
---
विविध विषयांवरील सकस आणि वाचनीय विशेषांकाचे उत्स्फूर्त स्वागत
इचलकरंजी, ता. ५ ः ‘सकाळ’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला. सायंकाळी रोटरी क्लब येथे आयोजित स्नेहमेळाव्यास विविध क्षेत्रांतील असंख्य मान्यवरांनी उपस्थिती लावून ‘सकाळ’वरील प्रेम आणखी वृद्धिंगत केले. या निमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या विविध विशेषांकाचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले.
यंदा ‘कृषिमंत्रा’, ‘वस्त्रोद्योग व्हिजन @ २५’ व ‘ब्रॅन्ड ऑफ सिटी’ असे सकस आणि वाचनीय विशेषांक प्रकाशित करण्यात आले. यात अनेक नामवंत तज्ज्ञांनी लेखन केले आहे. त्यामुळे हे विशेषांक संग्राह्य झाले असून, अनेक नावीन्यपूर्ण माहिती मिळाली असल्याची प्रतिक्रिया वाचकांनी या वेळी दिली. वस्त्रनगरीत गेल्या अडीच दशकांहून अधिक काळ ‘सकाळ’ आणि इचलकरंजीसह हातकणंगले व शिरोळ तालुक्यांचे नाते अधिक घट्ट बनले आहे. आज पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्ताने वाचक, विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतक यांनी स्नेहमेळाव्यास उत्स्फूर्तपणे गर्दी करीत ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव केला. रोटरी क्लबचे प्रांगण गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. सर्वच क्षेत्रांतील मान्यवरांनी या वेळी उपस्थिती दर्शवली.
‘सकाळ’तर्फे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव, जाहिरात उपसरव्यवस्थापक आनंद शेळके, व्यवस्थापक नंदकुमार दिवटे, लेखा व्यवस्थापक अरविंद वर्धमाने, बातमीदार पंडित कोंडेकर, ऋषीकेश राऊत, संदीप जगताप, सहायक व्यवस्थापक दत्ता टोणपे, बाजीराव पाटील आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. शुभेच्छा दिलेल्या मान्यवरांमध्ये ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे, विठ्ठल चोपडे, आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष शिवगोंडा खोत, अण्णासो गुंडे, शिवानंद रावळ, महादेव चिखलकर, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी, आवाडे बँकेचे अध्यक्ष स्वप्नील आवडे, वैशाली आवाडे, सुनील पाटील, वैशाली नायकवडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, उद्योजक संजय चौगुले, दीपक पाटील, संदीप कारंडे, श्रीनिवास बोहरा, सतीश डाळ्या, सुनील महाजन, विनय महाजन, पोलिस निरीक्षक सत्यवान हाक्के, सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ, अभिजित पाटील, इंडस्ट्रियल इस्टेटचे अध्यक्ष राहुल खंजिरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, कामगार नेते सदा मलाबादे, महादेव गौड, युवा नेते सौरभ शेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या शशिकला बोरा, पुंडलिक जाधव, श्रीकांत कदम, राजू आलासे, संगीता आलासे, रांगोळीचे मच्छिंद्र कुंभार, सरपंच संगीता नरदे, सुभाष काडाप्पा, महावीर मणेरे, सत्यनारायण धूत, प्रकाश गौड, भाऊसो आवळे, मनोज हिंगमिरे, उमाकांत दाभोळे यांचा समावेश होता.
या वेळी ‘सकाळ’चे संतोष जेरे, संतोष शिंदे, पद्माकर खुरपे, ‘अॅग्रोवन’चे राजकुमार चौगुले यांच्यासह बातमीदार गणेश शिंदे, जितेंद्र आणुजे, युवराज पाटील (दानोळी), अनिल केरीपाळे, रवींद्र पाटील (कबनूर), विवेक दिंडे, बाळासाहेब कांबळे, संजय पाटील, डी. आर. पाटील, अतुल मंडपे, सचिन शिंदे, राजू मुजावर, संतोष कमते, मनोज अथणे, प्रशांत भोसले, गजानन खोत आदी उपस्थित होते.
-----
संगणक प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप
रोटरी क्लब एक्झिक्युटिव्ह, श्री कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेतर्फे व ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने महिलांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण घेण्यात आले होते. १५ दिवसांच्या प्रशिक्षण कालावधीत विविध प्रकारचे संगणकीय कौशल्य वाढविण्याची माहिती देण्यात आली. हे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. स्नेहमेळाव्यात हा आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आल्याने प्रशिक्षणार्थी महिला भारावून गेल्या.