रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान
रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान

रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान

sakal_logo
By

jsp620
87260
कोथळी ः येथे रस्त्याच्या प्रारंभप्रसंगी राजेंद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले. धैर्यशील माने, सरपंच भरतेश खवाटे आदी मान्यवर उपस्थित होते.
----------
रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान
आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर; कोथळीत रस्ता कामाचा प्रारंभ
दानोळी, ता. ७ ः आमच्या खासदारकी व आमदारकीच्या काळामध्ये आम्ही अनेक प्रलंबित प्रश्नांना हात घालत ते पाठपुरावा करून मार्गी लावले आहेत. त्यात कोथळीतील २००५, २०१९, आणि २०२१ साठी महापुरावेळी गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेल्या जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या जुना शर्यती रोडचा प्रश्न आम्ही मार्गी लावला. याच्यामध्ये मला व खासदार धैर्यशील माने यांना समाधान वाटत असल्याचे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी कोथळी येथे केले.
ते कोथळी- निमशिरगाव या राज्य महामार्ग १९९ या रस्त्यासाठी जोडणारा ग्रामीण महामार्ग ११६ जुना शर्यती रोड, असा संबोधित असलेला रस्त्यासाठीच्या एक कोटींच्या कामाच्या प्रारंभप्रसंगी बोलत होते. खासदार धैर्यशील माने प्रमुख उपस्थित होते. आमदार राजेंद्र पाटील यांच्या फंडातून २३ लाख व खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून ७७ लाख फंड मंजूर करून त्या प्रारंभ दोघांच्या हस्ते झाला.
खासदार माने म्हणाले, ‘कोथळी गावाला हा रस्ता मंजूर करून देण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांच्यासोबत आम्ही याबद्दल चर्चा करून तातडीने हे काम मार्गी लावले आहे.’ शिरोळ तालुका सहकार विश्वस्त मंडळ अध्यक्ष संजय नादणे व भैरू हंकारे यांनी मनोगत केले. सरपंच भरतेश खवाटे, उपसरपंच राजश्री सुतार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य चंद्रकांत मोरे, देवगोंडा पाटील, बाहुबली ईसरांना, गौतम सावकर, सतीश मलमे आदी उपस्थित होते. स्वागत विजय खवाटे यांनी केले. आभार दिलीप मगदूम यांनी मानले.