एक वर्षे सक्तमजुरी - एसटी चालकाला मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक वर्षे सक्तमजुरी - एसटी चालकाला मारहाण
एक वर्षे सक्तमजुरी - एसटी चालकाला मारहाण

एक वर्षे सक्तमजुरी - एसटी चालकाला मारहाण

sakal_logo
By

एसटी बस चालकाला
मारहाणप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी

कोल्हापूर, ता. ७ ः एसटी बस चालकाला शिविगाळ करुन मारहाण करणाऱ्या आरोपीला एक वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. प्रविण जयराम शिलवंत (वय २७, रा. माळी मळा, सरनोबतवाडी, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एम. जगताप यांनी ही शिक्षा सुनावली. जानेवारी २०२० मध्ये उचगाव येथे ही घटना घडली होती.

अॅड. पी.जे. जाधव यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी सांगितले, की २३ जानेवारी २००२० ला एसटी बस चालक सागर सदानंद कोलते (रा. सर्वेश पार्क, फुलेवाडी) हे कोल्हापूर-हुपरी रस्त्यावर एसटी बसमधून प्रवासी वाहतूक करत होते. उचगाव येथील एका हॉटेलच्या परिसरात मोटारसायकलला एसटी बस घासूनही थांबवली नाहीस, म्हणून आरोपी प्रविण शिलवंत याने एसटी चालक कोलते यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच एसटी एसटी बसच्या काचाही फोडल्या. यानंतर चालक कोलते यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी प्रविण याच्याविरोधात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी या गुन्ह्याचा तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

प्रत्यक्षात सुनावणी सुरू झाल्यानंतर सरकारी वकील जाधव यांनी नऊ साक्षीदार तपासले. साक्षीदारांच्या साक्षी, प्रत्यक्ष पुरावा, सरकारी वकील जाधव यांचा युक्तीवाद, दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण न्यायालयाने आरोपी प्रविण शिलवंत याला एक वर्षे सक्त मजुरीची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.