गड-गोडसाखर कामगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-गोडसाखर कामगार
गड-गोडसाखर कामगार

गड-गोडसाखर कामगार

sakal_logo
By

87294

गडहिंग्लज : प्रलंबित मागण्यांबाबत प्रांताधिकारी वाघमोडे यांना निवेदन देताना ‘गोडसाखर’ निवृत्त कामगार संघटनेचे पदाधिकारी.
------

सात दिवसात बैठक बोलवा

‘गोडसाखर’ निवृत्त कामगारांची मागणी : ...अन्यथा बेमुदत रास्ता रोको

गडहिंग्लज, ता. ७ : औद्योगिक न्यायालयाच्या निकालानुसार कारखाना व ब्रिस्क कंपनीने आठ टक्के व्याजाने कामगारांच्या देय रक्कमेबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरविण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी सात दिवसात बैठक घ्यावी, अशी मागणी गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवृत्त कामगारांनी केली आहे. प्रांताधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिले आहे. अन्यथा १५ मार्चला बेमुदत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गडहिंग्लज साखर कारखान्याचे निवृत्त कामगार आपल्या थकीत देण्यांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. संचालक मंडळाची निवडणूक होऊन दोन महिने उलटले आहेत. गोडसाखरचे अध्यक्ष, साखर सहसंचालक, कामगार आयुक्तांसोबत बैठक घेऊन कामगारांचा प्रश्न सोडविण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे. देय रक्कमेबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरविणे, २९ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्ताची नक्कल ऐनवेळच्या विषयासह मिळावी, निवृत्त कामगारांची प्राव्हिडंड फंडाची रक्कम ब्रिस्क कंपनीकडून किती भरायची आहे याची नावासह यादी मिळावी आदी मागण्यांबाबत सात दिवसात बैठक बोलवावी. अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.
प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी निवेदन स्वीकारले. गोडसाखर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत, लक्ष्मण देवार्डे, सुरेश पाटील, सुभाष पाटील, अरुण लोंढे, श्रीकांत रेंदाळे, महादेव मांगले, संभाजी बुगडे, विजय कुंभार, रणजित देसाई यांच्या निवेदनावर सह्या आहेत.