आजरा ः जनआरोग्य योजना बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः जनआरोग्य योजना बातमी
आजरा ः जनआरोग्य योजना बातमी

आजरा ः जनआरोग्य योजना बातमी

sakal_logo
By

ajr72.txt
ajr72.jpg..... आजरा ः येथील माहेर हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेच्या प्रारंभप्रसंगी बोलताना आमदार प्रकाश आबिटकर. या वेळी अशोक चराटी, कॉ. संपत देसाई, डॉ. बर्नाड गॉडद, डॉ. बर्नडेट गॉडद आदी.
----------------------
शासनाच्या आरोग्य सुविधांचा लाभ घ्या
आमदार आबिटकर : आजऱ्यात माहेर हॉस्पिटलमध्ये जनआरोग्य योजनेचा प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ११ : सर्वसामान्यांसाठी राज्य शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबविल्या आहेत. जनतेच्या आरोग्याची होणारी हेळसांड होऊ नये यासाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ही याचाच एक भाग आहे. डॉ. गॉडद दाम्पत्याच्या प्रयत्नातून आजऱ्यामध्ये गोरगरीब जनतेसाठी आरोग्यविषयक नवे दालन सुरू होत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले.
येथील माहेर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुरू केलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार आबिटकर बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘अलीकडे उपचारांअभावी रुग्णांची फरफट होताना दिसते. मुळातच आजारांचे प्रकार इतके वाढले आहेत की, निदान होईपर्यंत व झाल्यावर रुग्णांना औषधोपचारासाठी प्रचंड खर्च करावा लागतो. खर्च करण्याची क्षमता नसल्यामुळे अनेकांना उपचारापासून वंचित राहावे लागते. यासाठी रुग्णांनी शासकीय रुग्णालयांना प्राधान्य द्यावे व तेथून उपचार घेतल्यास अत्यंत कमी खर्चात चांगल्या पद्धतीने उपचार होणे शक्य आहे. त्यातूनही ज्यांना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावयाचे आहेत त्यांनी प्रथम त्या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेची सुविधा आहे का, याची शहानिशा करून त्यानंतरच उपचारास प्राधान्य द्यावे. गॉडद दाम्पत्याने यापुढेही आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून विविध सेवा नागरिकांना देण्यासाठी प्रयत्न करावेत.
तहसीलदार विकास अहिर, नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा अस्मिता जाधव, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार, कॉ. संपतराव देसाई, सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे, नीलेश घाटगे, संजय पाटील, विजय थोरवत, संतोष भाटले, अश्विन डोंगरे, डॉ. रिया गॉडद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. डॉ. बर्नाड गॉडद यांनी स्वागत केले. डॉ. बर्नडेट गॉडद यांनी आभार मानले.