आरोग्य सेवा सक्षम करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य सेवा सक्षम करा
आरोग्य सेवा सक्षम करा

आरोग्य सेवा सक्षम करा

sakal_logo
By

87355
आजरा : येथील जनआरोग्य समिती काशिनाथ मोरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. विशाल शिंदे, डॉ. व्ही. जी. हतळगी आदी उपस्थित होते.

आरोग्य सेवा सक्षम करा
काशिनाथ मोरे; आजऱ्यात जनआरोग्य समिती कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ : राज्यामधील ग्रामीण भागातील सरकारी आरोग्य सेवा अनंत अडचणीतून जात आहे. याबाबत ग्रामसभांमधून चर्चा घडवून लोकांचा सहभाग वाढवणे व ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरकारी आरोग्य सेवा सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत तालुका समन्वयक काशिनाथ मोरे यांनी व्यक्त केले.
येथील पंचायत समितीच्या बीआरसी सभागृहात तालुका पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जन आरोग्य समितीची कार्यशाळा झाली. या वेळी मोरे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात सरकारी आरोग्य यंत्रणेत अनेक जागा रिक्त आहेत. शासकीय निधी व औषध साठा पुरेसा व वेळेवर उपलब्ध होत नाही. या सर्वत्र अडचणी असल्या तरी जन आरोग्य समिती व ग्रामपंचायतच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.’’ जिल्हा समन्वयक तायाप्पा कांबळे म्हणाले, ‘‘जन आरोग्य समिती बळकट करण्यासाठी दरमहा बैठक घेणे व शासकीय योजनांची माहिती करून त्याबाबत मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.’’
तालुका आरोग्य विस्तार अधिकारी व्ही. ए. काटकर म्हणाले, ‘‘बोगस व फिरत्या डॉक्टरांची माहिती गाव पातळीवर जमा करणे आवश्यक आहे.’’ उत्तूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल शिंदे व भादवण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. जी. हतळगी यांनी आरोग्य केंद्राच्या समस्या व प्रश्न याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी झालेल्या चर्चत वेळवट्टीच्या सरपंच मनीषा देसाई, खेडेचे सरपंच डॉ. संदीप देशपांडे, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, स्मिता पाटील, रूपाली पाटील, सुनील कांबळे, शकुंतला सुतार, समीर पारदे आदींसह जनआरोग्य समिती पदाधिकारी, पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते. संजय घाटगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सागर गुरव यांनी आभार मानले.
-----------
चौकट
पारेवाडी उपकेंद्राची जबाबदारी नगरपंचायतीने घ्यावी
पारेवाडी उपकेंद्र हे या वेळी पारेवाडी उपकेंद्र आजरा नगरपंचायत क्षेत्रात येत असल्याने कामाचा ताण व खर्चाची वाढ होत आहे. या उपकेंद्राची जबाबदारी आजरा नगरपंचायतने उचलावी, अशी मागणी करण्यात आली. रिक्त जागा व पुरेशा औषध साठा या मागणीसाठी ग्राम सभेत ठराव करणेचे ठरले. उपकेंद्र पातळीवर बाळंतपण सोपस्कर होत असल्याने समाधान व्यक्त केले.