निराधार योजनेचे पैसे जमा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निराधार योजनेचे पैसे जमा करा
निराधार योजनेचे पैसे जमा करा

निराधार योजनेचे पैसे जमा करा

sakal_logo
By

87383
आजरा : निराधार योजनेचे पैसे लाभार्थांच्या खात्यावर जमा व्हावेत, यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मारून मागणी करताना उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे संभाजी पाटील, युवराज पोवार, ओमकार माद्याळकर, दिनेश कांबळे व पदाधिकारी.


निराधार योजनेचे
पैसे जमा करा
उद्धव ठाकरे गट शिवसेनेची आजऱ्यात मागणी
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ७ : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे पैसे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे लाभार्थांची आर्थिक कुचंबना होत आहे. हे पैसे तातडीने जमा करावेत, अशी मागणी उद्धव ठाकरे शिवसेना गटाकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांना दिले. निवेदनानंतर तहसीलदार कार्यालयाच्या पायऱ्यांवर ठिय्या मारून लाभार्थांच्या खात्यावर तातडीने पैसे जमा करण्याची मागणी केली.
निवेदनात म्हटले आहे, शासनाने विधवा, वयोवृद्धांसाठी पेन्शन योजना सुरू केली. त्यामुळे या घटकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे; परंतु गत अनेक महिन्यांपासून त्यांच्या खात्यावर हक्काचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यांची आर्थिक ओढाताण होत आहे. तरी त्यांच्या खात्यावर शासनाने तातडीने पैसे जमा करून त्यांना दिलासा द्यावा. निवेदनावर उपजिल्हा प्रमुख संभाजी पाटील, तालुका प्रमुख युवराज पोवार, जयसिंग पाटील, शहरप्रमुख ओंकार माद्याळकर, समीर चॉँद, महेश पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.